अंकुश-मुक्ताची ‘डबल सीट’ 300 चित्रपटगृहांमधून…

Date:

 

‘स्वप्न बघणा-या आणि जगणा-या माणसांची गोष्ट’ सांगणारा आणि अंकुश चौधरी व मुक्ता बर्वे यांच्या सहजसुंदर अभिनयाने सजलेला ‘डबल सीट’ हा चित्रपट १४ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत असून राज्यभरातील तब्बल 300 चित्रपटगृहांमधून (6000 shows )तो प्रदर्शित होणार आहे. मायानगरी असलेल्या मुंबई शहरातील एका सर्वसामान्य जोडप्याची ही गोष्ट सर्वच स्तरातील प्रेक्षकांना भुरळ घालणारी आहे. क्षितीज पटवर्धन यांची कथा आणि समीर विद्वांस यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट एस्सेल व्हिजनच्या माध्यमातून प्रदर्शित होत आहे.

‘डबल सीट’ चित्रपटाची कथा जरी मुंबईतल्या जोडप्याची असली तरी ही गोष्ट सर्वच शहरातील मध्यमवर्गीय घरातील जोडप्याची आणि त्यांच्या स्वप्नांची आहे. आयु्ष्य जगतांना कायम विशिष्ट चौकटीतला आणि आवाक्यातलाच विचार करायचा ही मध्यमवर्गीय कुटुंबाची मानसिकता असते. ती चौकट मोडून त्या बाहेर उडी घ्यायचं स्वप्न बघण्याची आणि ते पूर्ण होण्यासाठी घ्याव्या लागणा-या कष्टाची ही गोष्ट आहे. मग हे स्वप्न एखादी गाडी घेण्याचं असो, घरातील नवीन मोठी वस्तू घेण्याचं असो किंवा नवीन घरच घेण्याचं असो त्यासाठी मेहनत ही करावीच लागते. असाच संघर्ष अमित नाईक आणि त्याची बायको मंजिरी नाईकचा आहे. कुरीअर कंपनीत काम करणारा अमित आणि खाजगी विमा कंपनीत काम करणारी मंजिरी हे लालबागमधील जुन्या चाळीतील घरात राहणारं मध्यमवर्गीय जोडपं. या दोघांची स्वप्न खुप छोटी छोटी आहेत आणि आपल्या या आयुष्यात ते आनंदीही आहेत. चाळीतील छोट्याशा घरात एकत्र कुटुंबात मंजिरी आणि अमित आनंदी असले तरी त्यांना हव्या असलेल्या ‘स्पेस’ची उणिव दोघांनाही जाणवतेय. ज्यामुळे दोघांची एक विचित्र घुसमट सुरू आहे. यातून बाहेर पडण्यासाठी अमित नवं घर घेण्याचं स्वप्नं बघतो आणि मंजिरीसहित घरातील सर्वजण त्याच्या पाठीशी उभे राहतात आणि इथून सुरू होतो प्रवास त्याच्या मेहनतीचा. हे स्वप्न पूर्ण करतांना त्याला कोणते अडथळे येतात? त्यांच्या मदतीला कोण धावून येतं ? या संघर्षात त्याचा विजय होतो का ? या सर्वाची गोष्ट म्हणजे ‘डबल सीट’ हा चित्रपट.

युट्युब आणि सोशल नेटवर्कवर सध्या या चित्रपटाची जोरदार हवा आहे. यातील सर्वच गाणी श्रवणीय झाली असून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे यांचा सहजसुंदर अभिनय सोबतीला वंदना गुप्ते, विद्याधर जोशी, संदीप पाठक, आसावरी जोशी, पुष्कर श्रोत्री अशा कसलेल्या कलाकारांची साथ हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य. सर्वसामान्य माणसांच्या स्वप्नांची आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी घ्याव्या लागणा-या ‘उडी’ची ही अतिशय सकारात्मक दृष्टीकोन देणारी गोष्ट येत्या १४ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

mail.google.commail.google.com

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....