पुुणे :
शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करताना राज्य सरकारच्या त्रिसदस्य समितीने भविष्याचा विचार करून नियोजन केलेले नाही याचा निषेध म्हणून खासदार वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आज दिनांक 9 ऑक्टोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन ते विभागीय आयुक्त कार्यालय येथे काढण्यात आला.
महसुल उपायुक्त ज्योतिबा पाटील यांना विधान भवनात खासदार वंदना चव्हाण यांनी विकास आराखडयाच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध करणारे पत्र पक्षाच्या वतीने दिले.
मोर्चामध्ये ‘नही चलेगी, नही चलेगी बीजेपी की हुकूमशाही नही चलेगी !’, ‘डी पी आमच्या हक्काचा नाही कुठल्या पक्षाचा’, ‘हटवा हटवा भाजपचा डीपी हटवा’, ‘वाचवा वाचवा पुणे शहराला वाचवा’, ‘विकासाचा संकुचित विचार करण्या बीजेपी सरकारचा धिक्कार असो’ अशा प्रकारच्या घोषणांचे फलक हाती धरून कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी घोषणा दिल्या.
या मोर्चामध्ये खासदार, शहराध्यक्ष अॅड. वंदना चव्हाण, महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, सभागृह नेते बंडू केमसे, अंकुश काकडे, चेतन तुपे, प्रदेश सरचिटणीस अशोक राठी, बापू पठरे, मोहनसिंग राजपाल, माजी आमदार कलम ढोले-पाटील, अनिल भोसले, माजी महापौर चंचला कोद्रे, माजी उपमहापौर दीपक मानकर, माजी महापौर वैशाली बनकर, अॅड म.वि.अकोलकर, रूपाली चाकणकर, मनाली भिलारे, पद्मा कांबळे, श्वेता होनराव, नंदा लोणकर, आनंद रिठे, इक्बाल शेख, राकेश कामठे, नितीन उर्फ बबलू जाधव, मीनल सरवदे, डॉ. सुनीता मोरे, रजनी पाचंगे, सर्व सेलचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिकेतील सत्ताधारी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या ताब्यात असलेला डीपी राज्य सरकारने ताब्यात घेतला. या आराखड्यात शहरातील उद्याने, क्रीडांगणे, आरोग्य, शाळांची आरक्षणे वगळली आहेत. परिणामी शहराच्या विकासाला हा आराखडा मारक ठरणार असल्याने राज्य सरकारच्या मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या या कृती विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता.