विद्यापीठ रस्त्यावरील १०० झाडे वाचल्याचे स्वागत
पुणे :
पुणे विद्यापीठ चौकातील रस्ता रुंद करण्यासाठी १०५ वृक्षांपैकी १०० वृक्ष वाचविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याबद्दल ‘सेव्ह पुणे हिल्स इनीशिएटिव्ह’ च्या वतीने स्वागत करण्यात आले आहे .’सेव्ह पुणे हिल्स इनीशिएटिव्ह’च्या वतीने अध्यक्ष दीपक बिडकर आणि सचिव ललित राठी यांनी पत्रकाद्वारे स्वागत केले. हे वृक्ष वाचविण्यासाठी या संस्थेसह खासदार अनिल शिरोळे, नागरिकांनी आक्षेप, हरकती नोंदविल्या होत्या . आंदोलन केले होते .
अजूनही बर्याच वृक्ष तोडी विचार न करता केल्या जात असल्याने प्रत्येक वृक्ष तोडीच्या प्रस्तावावेळी नोटीस काढली जावी आणि नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात असे आवाहन ‘वृक्षम’ या स्वयंसेवी गटाचे मार्गदर्शक विनोद जैन यांनी केले आहे .