पुणे –
पुण्यातील मल्लांचे जगभरात नाव होण्याकरिता मंगळवार पेठ येथील शिवाजी आखाड्यास अत्याधुनिक कुस्तीकेंद्र बनवण्याचा मानस कसबा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक मानकर यांनी व्यक्त केला. मानकर यांच्या प्रचारानिमित्त कसबा विधानसभा मतदार संघात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
तरुण पिढीस आज वातानुकुलीत जीमचे आकर्षण वाटत आहे. यामुळे पारंपरिक व्यायाम पद्धतीत शिकवणार्या तालीम पद्धतीचे आकर्षण कमी झाले आहे. या व्यायाम पद्धतीला प्रोत्साहन देण्यास आपला प्रयत्न राहणार असल्याचे मानकर यांनी सांगितले.उपमहापौर असताना शनिपार येथील निंबाळकर तालमिची भिंत कोसळली असता मानकर यांनी केवळ दोन दिवसात सदर तालमीच्या भिंतीचे काम करुन तालिम पूर्ववत केली होती. या स्मृतींचा उजाळा विश्वस्त बंडू अण्णा कर्पे यांनी दिला.
बकरी ईदचे औचित्य साधून सर्व मुस्लीम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा मानकर यांनी दिल्या. पदयात्रेत मौलाना काजीसाहब, मौलान इम्रान साहब, मौलान इब्राहम साहब व अनेक राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. मंगळवार पेठ येथील शिवाजी आखाडा हा अत्यंत जुना कुस्तीचा आखाडा असून,या आखाड्यात नामवंतांच्या लढती झाल्या आहेत.
शिवाजी आखाड्याचे आधुनुकीकरण करणार
Date: