सातारा (जि.मा.का) : ज्या शेतकऱ्यांनी 31 जूलै 2015 पूर्वी पेरणी करु शकले नाहीत व राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभागी होण्यास इच्छुक आहेत, अशा शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विम्यात सहभागी होण्यासाठी दि. 7 ऑस्टपर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे , अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांनी विहीत कागदपत्रासह नजीकची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक अथवा राष्ट्रीयकृत बँकेकडे संपर्क साधून आपला विमा हप्ता विहीत वेळेत भरणाबाबतचे तसेच अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा असे अवाहन दि.4 जून 2015 रोजीच्या शासन निर्णयाव्दारे खरीप हंगाम 2015 मध्ये राष्ट्रीय कृषी विमा योजना पुढे सुरु ठेवण्यास शासनाने मान्यता दिली असून हंगामासाठी पीके व क्षेत्र अधिसूचित करणेत आली आहेत. तसेच सदर योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होणेसाठी 31 जूलै 2015 ही अंतिम मुदत निर्धारित करणेत आली होती. राज्यात पावसाने ताण दिल्याने वेळेत पेरणी करणे शक्य झाले नाही, अशा शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता यावा या उद्देशाने उशीराने पेरणी होणाऱ्या क्षेत्रासाठी विमा संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे या योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ मिळणेविषयी मागणी करणेत आली होती. 7 ऑगस्ट 2015 पर्यंत पेरणी होणाऱ्या क्षेत्रासाठी विमा संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने खालील अटींसह राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 7 ऑगस्ट 2015 पर्यंत वाढविणेत आली असल्याचे शासन निर्णयाव्दारे कळविणेत आले आहे.
ही मुदतवाढ 31 जुलै 2015 नंतर पेरणी होणाऱ्या व दि.1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2015 या कालावधीत पेरणी/ लागवड केलेल्या क्षेत्रासाठी लागू राहील, शेतकऱ्यांनी पीक विमा प्रस्तावासोबत पिकाची स्थिती चांगली असल्याची नोंद करणे आवश्यक आहे, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा प्रस्तावासोबत पेरणीचे क्षेत्र स्पष्टपणे नमूद केलेले विहीत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे, विमा संरक्षित रक्कम ही उंबरठा उत्पन्नाचे किमान अधारभूत किमतीनुसार येणाऱ्या रकमेइतकी (सर्वसाधारण विमा संरक्षण) राहील. या कालावधीत अतिरीक्त विमा संरक्षण (150 टक्के) घेता येणार नाही, प्रस्तुत मुदतवाढीसंदर्भात दि.4 जून 2015 च्या शासन निर्णयाव्दारे निश्चित करण्यात आलेल्या इतर सर्व अटी व शर्ती जशाच्या तशा लागू राहतील असेही श्री. शिंदे यांनी कळविले आहे.
राष्ट्रीय कृषी विमा योजनेस 7 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ – जितेंद्र शिंदे
Date: