नवी दिल्ली –पाक ची निंदा करणण्याच्या भारताच्या प्रस्तावाला न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया नंतर आता चक्क रशियानेही विरोध केल्याने भारताच्या जागतिक स्तरावरील प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे . दरम्यान रशियातच ८ जुलै ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाक चे नवाज शरीफ यांची भेट होत असल्याचे वृत्त आहे . आज पासून नरेंद्र मोदी हे सहा देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत
दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थसाह्यासंदर्भात अलीकडेच ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी, दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱ्या पाकिस्तानविरोधात भारतानं रोखठोक भूमिका मांडली. जमात-उद-दावा आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांवर कुठलीही कारवाई न करणाऱ्या पाकला बड्या देशांकडून चपराक बसावी, या उद्देशानं भारतानं निंदाप्रस्ताव सादर केला होता. त्याला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियानं विरोध केलाच; पण भारताशी चांगले संबंध असलेल्या रशियानंही त्या विरोधात भूमिका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना धक्का दिला आहे. वास्तविक, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत काश्मीर मुद्द्यावर रशियानं कायमच भारताला साथ दिली आहे. त्यामुळे आता अचानक तसे का झाले यावर राजकीय समीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (सोमवार) रशिया आणि मध्य आशियातील पाच देशांच्या सात दिवशीय दौ-यावर आहेत. यामध्ये कजाकिस्तान, किर्गिस्तान, तजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उज्बेकिस्तान या देशांचा समावेश आहे. उज्बेकिस्तानपासून त्यांचा दौ-याची सुरुवात होणार आहे. दरम्यान, ब्रिक्स आणि शंघाई शिखर संमेलनामध्ये भाग घेणार आहेत. या ठिकाणी त्यांची पाक चे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबत भेटहोणार असल्याचे वृत्त आहे .

पंतप्रधान कार्यालयाच्या माहिनुसार, ‘ताशकंदमध्ये आपले लोकप्रिय पंतप्रधान लालबादूर शास्त्री यांचे निधन झाले होते. त्या ठिकाणी जावून नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. शिवाय उज्बेकिस्तान आणि भारतामध्ये व्यापार वाढावा यासाठी अनेक महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी केली जाणार आहे’, त्यानंतर 7 ते 8 जुलैला पंतप्रधान किर्गिस्तानला जातील. 8 जुलैच्या रात्री ते रशियाला पोहोचतील. तिथून सरळ तुर्कमेनिस्तानला रवाना होतील. 12 जुलैला किर्गिस्तान पोहोचतील. तजाकिस्तानमध्ये त्यांच्या दौ-याचा समारोप होणार आहे.
ब्रिक्स राष्ट्रांच्या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करणार आहेत. आयसिसचा धोका आणि दहशतवादाविरोधातील रणनीती, हाच या परिषदेचा अंजेडा असल्यानं तिथे रशियाची नेमकी भूमिका कळू शकेल