‘ वंदना चव्हाण : अनरेवेलिंग द ट्रू स्टेट्समनशिप ‘ या फोटो बुक चे महापौरांच्या हस्ते प्रकाशन
पुणे
पुण्याच्या पर्यावरण प्रेमी राज्यसभा सदस्य एड . वंदना चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वावरील ‘प्रबोधन माध्यम प्रकाशन ‘ निर्मित ‘ वंदना चव्हाण : अनरेवेलिंग द ट्रू स्टेट्समनशिप ‘ या ‘फोटो बुक’ चे प्रकाशन आज महापौर दत्ता धनकवडे ,खा . वंदना चव्हाण ,’प्रबोधन माध्यम प्रकाशन ‘ च्या संचालक गौरी बिडकर यांच्या हस्ते आणि श्री हेमंत चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले .
वंदना चव्हाण यांच्या वाढ दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज सकाळी राष्ट्रवादी शहर कार्यालयात या फोटो बुक चे प्रकाशन करण्यात आले .
राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहराध्यक्ष म्हणून केलेली कामगिरी ,राज्यसभा सदस्य या नात्याने केलेले अभ्यासदौरे ,पर्यावरण स्नेही उपक्रम ,महिला सक्षमीकरणाचे उपक्रम ,शहर विकास प्रश्नावर केलेले काम याचा मागोवा या ‘ कॉफी टेबल बुक ‘ प्रकारातील पुस्तकात घेण्यात आला आहे .
या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे .
‘प्रबोधन माध्यम ‘ प्रकाशनाचे चे गौरी बिडकर , महेश कुलकर्णी ,सारिका रोजेकर ,सचिन सूर्यवंशी ,श्रीकांत वाघ यांनी आज खासदार वंदना चव्हाण यांना ही वाढ दिवसाची भेट दिली !
विविध उपक्रमांनी वाढदिवस साजराखासदार वंदना चव्हाण यांचा वाढदिवस शहरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वंदना चव्हाण यांच्या हस्ते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आरती करण्यात आली. मनाली भिलारे यांनी वेबसाईट तयार केली. श्वेता होनराव यांनी शांततेचे प्रतिक म्हणून कबुतरे उडवली. पक्ष कार्यालयात वंदना चव्हाण यांच्या हस्ते दहा वाजून दहा मिनिटांनी केक कापण्यात आला. यावेळी महापौर दत्ता धनकवडे, स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, माजी महापौर चंचला कोद्रे, नगरसेवक विशाल तांबे, अप्पा रेणूसे, विकास दांगट, महेंद्र पठारे, संजिला पठारे, सुमन पठारे, कमल ढोले-पाटील, दीलीप बराटे आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नितीन उर्फ बबलू जाधव, राकेश कामटे, अशोक राठी यांनी वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन केले.