मुंबई – मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर दरड कोसळल्याने या मार्गावरून जाणाऱ्या एका कारवर एक मोठ्ठा दगड कोसळल्याने त्यात दोन जण ठार झाल्याचे वृत्त आहे.यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल 9 तासांनंतर येथील वाहतूक पूर्ववत झाली आहे.मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ बोरघाटात दोन गाड्यांवर मोठी दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत दोन गाड्यांमधील दोघे जण ठार झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.
या घटनेत डोंबिवलीचे शशिकांत धामणकर आणि भाईंदरचे दिलीपभाई पटेल यांचा जागीच मृत्यू झाला आहे तसंच या घटनेत तीन महिलाही जखमी झाल्या आहे. पोकलेन पोहचण्यास विलंब होत असल्याने आणि घाटात सुरू असलेल्या पावसामुळे दरड हटवण्यास अडचणी येत आहेत.दरड कोसळल्याने मार्गावर मोठ्याप्रमाणावर दगडे आणि मातीचा ढिगारा तयार झाला .
पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अडोशी येथील बोगद्या जवळ ही दरड कोसळलेली आहे. त्यामुळे दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प आहे. दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप मृतांची आणि जखमींबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. कार रस्त्यावरून जात असताना मोठे दगड थेट कारवर पडल्याने ही दुर्घटना घडल्याचेही पोलिसांनी सांगितले.दरड कोसळल्याने मुंबई-पुणे द्रुतगर्ती मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही शहरांतील प्रवाशांची सोय करण्यासाठी आज (रविवार) पुणे आणि मुंबई दरम्यान रात्री आठ वाजता सोळा डब्यांच्या दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली
यापूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर २२ जूनला दरड कोसळल्याची घटना घडली होती. यामुळे एक्स्प्रेस वे २४ तास बंद ठेवण्यात आला होता. आता पुन्हा दरड कोसळल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय