गणेश उत्सवानिमित भवानी पेठमधील चुडामण तालीमजवळील जय भवानी मित्र मंडळाच्यावतीने भव्य नेत्रतपासणी शिबीर घेण्यात आले तसेच चष्मे वाटप करण्यात आले . के. एम. हेल्थ केअर असोसिएशनचे विशेष सहकार्य लाभले . यावेळी मंडळाचे अध्यक्ष मुनवर खान , उपाध्यक्ष नंदू बनसोडे , रॉकी परेरा , कार्याध्यक्ष कन्हेय्या परदेशी , खजिनदार विलास प्रभुणे , सचिव राजेश परदेशी , सहसचिव सुनील सकट , प्रकाश बंडेल्लू , अफझल खान , यश बनसोडे , अनिल सकट , रितेश सकट , कादर खान , ज्युडील नायडू आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले .
नेत्र तपासणीसाठी डॉ . मुकेश विसपुते , संदीप सोनार , तमन्ना शेख यांनी विशेष परिश्रम घेतले . या नेत्र तपासणी शिबिरात २५० जणांची नेत्र तपासणी करण्यात येऊन २५ जणांना चष्मे वाटप करण्यात १० मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे .