आंतरराष्ट्रीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या मिसबाह शेख, ललिताकुमारी चौधरी यांना प्रथम क्रमांक
पुणे ः
आयडिएल कॉलेज ऑफ फार्मसी (कल्याण) आयोजित आंतरराष्ट्रीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत एमसीई सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या मिसबाह शेख, ललिताकुमारी चौधरी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
त्यांना रोख तीन हजार आणि प्रशस्तिपत्र मिळाले. ‘बदलत्या आरोग्य विश्वातील फार्मासिस्टची भूमिका’ या विषयावर स्पर्धा झाली. त्यांना प्रा. किर्ती सपारे यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार, प्रा. इरफान शेख, प्राचार्य व्ही.एन. जगताप यांनी अभिनंदन केले.