Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेसची राज्यस्तरीय प्रमुख पदाधिकारीची बैठक संपन्न

Date:

unnamed

अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेसची राज्यस्तरीय  प्रमुख पदाधिकारीची बैठक इन्स्पेक्शन बंगलोमधील सभागृहात पार पडली . या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद परमार , राष्ट्रीय प्रमुख मंत्री सोहन सिंह , राष्ट्रीय उपाध्यक्ष भिकाचंद मेमजादे , राष्ट्रीय संघटन मंत्री विकी चांगरे , धनराज बिर्दा ,राष्ट्रीय महामंत्री डॉ. अनुपकुमार बेगी , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतिश लालबिगे , अहमदनगरचे प्रतिनिधी अनिल भिंगारदिवे , नाशिकचे प्रतिनिधी उमरवाल , पिंपरी चिंचवड महापालिका प्रतिनिधी शिरीष जाधव , संभाजी देशमुख , बाबा गोतेवार , अजित मापारे , जयंत मोडक , श्रीकांत डोळस , साजन त्रिभुवन , अजय क्षीरसागर , सुर्यकांत यादव आदी मान्यवर उपस्थित होते .

  या बैठकीत मेहतर वाल्मिकी समाजाला आरक्षण देण्यात यावे , सफाई काम अत्यावश्यक सेवा असल्यामुळे सफाई कामातून ठेकेदारी पद्धत कायम स्वरूपी बंद करण्यात यावी , महाराष्ट्र व इतर राज्यातील सफाई कर्मचारी आयोगाचे गठण करण्यात यावे , आणि त्या आयोगावर मेहतर वाल्मिकी समाज आणि सफाई कामगार वर्गातील कार्यकर्त्यांची नियुक्ती करावी , महाराष्ट्र वाल्मिकी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी , मेहतर वाल्मिकी समाज भूमिहीन असून त्यांना शेतीयोग्य कमीत कमी दहा एकर जागा महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात यावी , माथाडी कामगार बोर्डाच्या धर्तीवर वासुदेवरावजी चांगरे सफाई कामगार कल्याण बोर्डाची स्थापना करावी , मेहतर वाल्मिकी समाजाच्या कार्यकर्त्यांना महर्षी नवल महाराज पुरस्कार देण्यात यावा , लाड पागे समितीच्या शिफारशीच्या सर्व अटी राज्य , केंद्र , शासकीय , निमशासकीय विभागात लागू कराव्यात , महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाने सादर केलेल्या १९९८ – ९९ च्या रिपोर्टची त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी . मेहतर वाल्मिकी समाजाच्या लोकांना जात प्रमाणपत्र देण्याची १९५० ची अट शिथिल करण्यात यावी , मेहतर वाल्मिकी सर्वागीण विकास समितीचे पुनर्वसन करून शासकीय अधिकार देण्यात यावे , मेहतर वाल्मिकी समाजाच्या सर्वागीण विकासासाठी महाराष्ट्र राज्य हाय पावर समितीची स्थापना करण्यात यावी , सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या रोजंदारी उपलब्ध करण्यात यावी , महाराष्ट्र राज्याचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये महर्षी वाल्मिकी सांस्कृतिक भवनाचे निर्माण करण्यात यावे व त्याकरिता जागा उपलब्ध करण्यात यावी , शासकीय व निमशासकीय विभागात काम करणाऱ्या सफाई कामगारांना उपलब्ध करून दिलेल्या निवास त्यांना मालकी हक्काने त्वरित देण्यात याव्या .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पूर्व पुण्यात शरद पवार,उद्धव ठाकरेंसह खा.अमोल कोल्हेंना अजितदादांचा झटका

शहर अध्यक्षांच्या एककल्ली पणाचा शरद पवार गटाला दणका...