कॉमेडीचा बाप येतोय … न.स.ते. उद्योग झी टॉकीजची हटके मालिका !!

Date:

दोन घटका करमणूक होईल व थोडे खळाळून हसता येईल अशा प्रकारच्या मनोरंजनाची नेहमीच गरज असते. विनोदी कार्यक्रम सर्वच मोठय़ा आवडीने पाहत असतात. हीच गरज हेरून झी टॅाकीज या चित्रपट वाहिनीने मनोरंजनाच्या क्षेत्रात आणखी एक मोठे पाऊल टाकत न.स.ते. उद्योग हा एक  हलका – फुलका विनोदी  कार्यक्रम प्रेक्षकांच्या  भेटीला  आणला आहे.   मराठी मनोरंजनाच्या दुनियेत आपल्या प्रेक्षकांना सातत्याने नवनवीन दर्जेदार कार्यक्रम देणा-या झी टॅाकीज वाहिनीने आणलेल्या न.स.ते. उद्योग या कार्यक्रमातून प्रेक्षकांना धमाल अभिनय, खळखळून हसवणारे संवाद आणि निखळ मनोरंजनाची ट्रीट  मिळणार आहे. येत्या २९ ऑक्टोबरपासून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाद्वारे मराठी सिनेमा आणि नाटकांमधील दिग्गज कलाकार छोट्या पडदा गाजवायला येत आहेत. न.स.ते. उद्योग करण्यासाठी  सुप्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर आणि त्यांच्याबरोबर निलेश दिवेकर, नम्रता आवटे, पंकज पंचारिया, जनार्दन लवंगारे हे विनोदवीर पुढाकार घेणार आहेत. दर आठवड्याला एक नवा उद्योग करत या विनोदवीरांचे न.स.ते. उद्योग हास्याची कारंजी फुलवणार आहेत.

शिऱ्याच्या भूमिकेतून गाजलेले आणि सध्या हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये कार्यरत असलेले विकास कदम  आपल्या विनोदाचे ‘उत्कृष्ट टायमिंग‘ घेऊन प्रथमच मराठी टेलिव्हिजन शो च्या दिग्दर्शनात उतरत आहेत.   विनोदाची चौफेर फटकेबाजी असलेल्या न.स.ते. उद्योग या कार्यक्रमाबद्दल बोलताना झी टॅाकीजचे बिझनेस हेड  बवेश जानवलेकर म्हणाले की, झी टॉकीज ही चित्रपट वाहिनी असली तरी प्रेक्षकांची कॉमेडीची आवड लक्षात घेऊन आम्ही या नवीन कार्यक्रमाची निर्मिती करत आहोत. रोजचे ताणतणाव विसरुन दोन घटका मनमुराद हसण्याची संधी या कार्यक्रमातून प्रेक्षकांना मिळत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचे मनोरंजन करणारा न.स.ते.उद्योग हा नवीन कार्यक्रम २९ ऑक्टोबरपासून दर रविवारी रात्री ९.००  वा. झी टॅाकीजवर पहाता येईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईतील सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांच्या तपासणीचा अहवाल द्या : डॉ. नीलम गोऱ्हे

पत्राची दखल घेत महापालिका आयुक्तांकडून ई-मेल संबंधित विभागाकडे पाठविण्यात...

एकवीरा देवी मंदिराच्या पायथ्याशी निवारा शेडसाठी आमदार निधीतून १२ लाख रुपयांची शिफारस : डॉ. नीलम गोऱ्हे

एकवीरा मातेच्या चरणी प्रार्थना; राज्यातील दुष्काळाचे संकट दूर होऊन...

IDBI बँकेतील ६०.७२% हिस्सा विदेशी कंपनीला विकणे बेकायदेशीर व देशासाठी धोकादायक: विश्वास उटगी.

IDBI बँकेतील LIC आणि भारत सरकारचे भागभांडवल परदेशी गुंतवणूकदाराला...