Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर रंगणार इरफान खानचा ‘मदारी’चा खेळ

Date:

 

1 2 3 erfaan

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची हवा बॉलिवुडमध्ये आता जोरातच पसरली आहे. या मंचावर आजवर जॉन अब्राहम, सोनम कपूर, बॉलिवुड किंग शाहरूख खान, आणि दबंग खान सलमान खान सारख्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावल्यानंतर या यादीत आता आणखी एका गुणवान बॉलिवुड अभिनेत्याच्या नावाचा समावेश होणार आहे. आपल्या आगामी ‘मदारी’ या हिंदी चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने राष्ट्रीय पारितोषीक विजेता अभिनेता इरफान खान थुकरटवाडीमध्ये येणार आहे. नुकतंच इरफानच्या या भागाचं चित्रीकरण झालं असून येत्या सोमवारी म्हणजेच १८ जुलैला रात्री ९.३० वा. झी मराठीवरून हा भाग प्रसारित होणार आहे.

आपल्या संवादफेकीच्या खास शैलीमुळे लोकप्रिय झालेला आणि अभिनयसंपन्न अभिनेता अशी ओळख इरफान खानची आहे. ‘हासिल’, ‘मकबुल’, ‘पिकू’, ‘पानसिंग तोमर’, ‘लंचबॉक्स’, ‘तलवार’सारख्या वेगळ्या धाटणीच्या हिदी चित्रपटांपासून ‘लाइफ ऑफ पाय’, ‘स्पायडर मॅन’ आणि ‘ज्युरासिक वर्ल्ड’ सारख्या हॉलिवड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप इरफानने सोडली आहे. इरफान खानचा चित्रपट म्हटलं की काही तरी वेगळं बघायला मिळणार हे प्रेक्षकांना माहित असतं त्यामुळे तेही त्याच्या चित्रपटाची वाट बघतात. आता इरफानचा मदारी हा नवा चित्रपट येतोय ज्याचं दिग्दर्शन आपला मराठमोळा लय भारी दिग्दर्शक निशिकांत कामतने केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने इरफान थुकरटवाडीत आला त्याच्या सोबतीला चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असलेले तुषार दळवी आणि उदय टिकेकर ह मराठमोळे अभिनेतेही होते.

 थुकरटवाडीकरांचा बिल्लू आणि लाइफ ऑफ पाय

आपल्या गावात आलेल्या मान्यवर पाहुण्यांच्या एखाद्या चित्रपटावर आधारित स्वतःची वेगळी कलाकृती सादर करणे ही थुकरटवाडीची जणू परंपराच. याही भागामध्ये इरफान खान यांच्या ‘बिल्लू’ आणि ‘लाइफ ऑफ पाय’ या दोन गाजलेल्या चित्रपटांवरून त्यांनी आपलाच चित्रपट तयार केला ज्याचा इरफाननेही मनसोक्त हसून आनंद लुटला.

 पोस्टमन काकांनी केलं हळवं   

एका बाजूला आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसविणारा हा मंच आपल्या सामाजिक जाणिवा जागृत ठेवून प्रेक्षकांना अंतर्मुखही करतो. आजवर अनेक सामाजिक मुद्दे आपल्या पद्धतीने मांडणा-या या मंचावर येणारे पोस्टमन काकाच्या पत्रांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. याही भागात पोस्टमन काका एक पत्र घेऊन आले होते जे एका माकडाने लिहिलं होतं. मदारी आपल्या तालावर माकडाला नाचवतो आणि त्यातून लोकांचं मनोरंजन होतं. पण आज परिस्थिती अशी आहे की माणूसच व्यवस्थेच्या हातचं माकड बनला आहे आणि ही व्यवस्था त्याला नाचवत आहे. याच आशयाचं हे पत्र ऐकून इरफान आणि उपस्थित सर्वच मंडळी भावूक झाली. इरफानने हे पत्र ऐकून पोस्टमन काकांना आणि पत्र पाठवणा-या त्या अज्ञात माकडाला सलाम केला.धम्माल मजा मस्ती सोबतच काही हळव्या प्रसंगांनी सजलेला हा ‘चला हवा येऊ द्या’ चा भाग प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. येत्या सोमवारी हा भाग प्रसारित होणार असून मंगळवारच्या भागात ‘हाफ तिकीट’ आणि ‘अॅंड जरा हटके’ या मराठी चित्रपटांचे कलाकार आणि तंत्रज्ञ यांचा सहभाग या कार्यक्रमात असणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बँकॉकहून पुण्यात तस्करी:10.3 कोटींचे हायड्रोपोनिक गांजा पकडला-तिघांना अटक

पुणे-डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट (डीआरआय) च्या पुणे, मुंबई शाखेतील...

भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी.

भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी राजीव गांधींच्या बलिदान दिनी...