तुमच्यातल्या वेडेपणाचा सन्मान – YZ अवॉर्ड्स !

Date:

शोधा आपल्यातलं YZ व्हर्झन आणि मिळवा  ‘YZ अवॉर्ड ’ !

index index1
पुणे-(कुशल कोंडे याजकडून )
अत्यंत अनोखं नाव असलेल्या YZ चित्रपटाकडून YZ अवॉर्ड्स जाहीर होत आहेत ! निर्माते, एव्हरेस्ट एंटरटेनमेंट चे संजय छाब्रिया आणि प्रतिसाद प्रॉडक्शनचे अनीश जोग ह्यांच्या, YZ  ह्या अत्यंत चर्चेत असलेल्या चित्रपटाचं लेखन क्षितिज पटवर्धन आणि दिग्दर्शन समीर विद्वांस ह्या दिग्गज जोडीनं केलं असून चित्रपटात सागर देशमुख, अक्षय टांकसाळे, सई ताम्हणकर ,पर्ण पेठे आणि मुक्ता बर्वे, हे सगळेच आपल्या कसदार अभिनयातून नेहमीपेक्षा खूपच वेगळ्या भूमिकांमधून दिसणार आहेत .

आत्तापर्यंत चित्रपटांना अवॉर्ड्स मिळत आले आहेत पण YZ ह्या हटके नाव असलेल्या हटके चित्रपटाकडूनच ‘YZ अवॉर्ड्स’ हे हटके अवॉर्ड्स दिले जाणार आहेत ! ह्या  अवॉर्ड्स साठी तुम्हीही पात्र ठरू शकता ! अवॉर्ड च्या नावात ‘YZ’ जरी असलं तरी इथे खूपच वेगळा अर्थ अभिप्रेत आहे ! इथे सन्मान होईल तुमच्यातल्या हटके जगण्याच्या पद्धतीचा, तुमच्यातल्या अटीट्युडचा !

तुमच्याकडे जर एखादी भन्नाट कला, छंद, शोध किंवा एखादा अभिनव उपक्रम म्हणजे एखादं सामाजिक कार्य, भन्नाट कलाप्रकार  की जो जोपासण्यासाठी तुम्ही अक्षरशः वेडे झाले आहात तर ह्या अवॉर्डच्या निवड प्रक्रियेसाठी तुम्ही तुमची एंट्री देऊ शकता. त्यातून दहा विजेते एका पॅनेल मार्फत निवडले जातील. १२ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या आगामी YZ ह्या चित्रपटाच्या टीमकडून, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर जरी हे अवॉर्ड्स दिले जाणार असले तरी आता दरवर्षीच हे अवॉर्ड्स देण्यात येतील. भन्नाट गोष्टीचा भन्नाट ध्यास घेतलेली कोणतीही व्यक्ती, संस्था ह्या स्पर्धेत सहभागी होऊ शकते पण ह्या ध्यासाच्या मागे असतांना ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीच्या तारखा मात्र लक्षात ठेवा ! १५ जुलै ते २८ जुलै ह्या काळात आमच्याकडे आपल्या प्रवेशिका पाठवायच्या आहेत. विजेत्यांना आणि त्यांच्यातील YZ पणाला ट्रॉफी आणि आकर्षक बक्षिसांनी सन्मानित केलं जाईल . आम्हाला आपली माहिती आणि आपण करत असलेल्या भन्नाट गोष्टीचा प्रूफ वजा फोटोyzawards2016@gmail.com ह्या पत्त्यावर मेल करा किंवा facebook.com/yzthefilm इथे मेसेज करा .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बीआरटी मध्ये 20 वर्षात जनतेचे 1100 कोटी वाया घालवण्याचे श्रेय कुणाचे?

कारभाऱ्यांच्या अपयशाचे स्मारक म्हणून एक बसस्टॉप चे जतन करावे:...

आरक्षण उप वर्गीकरणाला परिषदेचा विरोध – ॲड. जयदेव गायकवाड

वर्गीकरणाच्या नावाखाली वाद निर्माण केले जात आहेत - ॲड....

एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता, भरतीला गती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधानपरिषदेत डॉ. नीलम गोऱ्हेंची यांची जोरदार मागणी

एमपीएससीने विद्यार्थ्यांशी थेट संवादाबरोबरच वेळबद्ध भरती, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया...