पुणे(रामकुमार शेडगे याजकडून )-
रसिक प्रेक्षकांनी तुडूंब भरलेल्या नाट्यगृहामध्ये आषाढी एकादशी निमित्ताने एका वेगळा भक्तरंग अनुभवयास मिळाला. राजेश दातार यांच्या गायनाला रसिकांनी विशेष पसंती दिली. तसेच अमर ओक यांच्या बासरी वादनाने कार्यक्रमात एक वेगळी अनुभूती पाहवयास मिळाली. कार्यक्रमाला समर्पक अशी साथसंगत – मिलिंद गुणे, अभिजित जायदे, मनोज भांडवलकर, आनंद टाकळकर यांनी केली. त्यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
सादर कार्यक्रम ‘आण्णा भाऊ साठे’ स्मारक, पद्मावती येथे हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. संत दर्शन मंडळाचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष श्रीराम साठे यांना श्रद्धांजली वाहून या कार्यक्रमाची सुरवात झाली. यापुढे दरवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीला असेच विविध कलाकारांचे दर्जेदार भक्तिमय कार्यक्रम ‘सर्वोत्कर्ष ट्रस्ट’ मार्फत करण्यात येणार आहेत. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष व गायक राजेश दातार यांनी दिली.