Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

गायिका योगिता गोडबोले ह्यांच्या “ही आठवण ” गाण्याचे ध्वनिफीत प्रकाशन!

Date:

मराठी संगीत विश्वात सध्या अनेक बदल होत आहेत. अनेक नावाजलेले गायक आणि गायिका त्यांचे स्वतःचे टॅलेंट दाखवण्यासाठी वेगेवेगळे प्रयोग करत आहेत. मराठी संगीत क्षेत्रातील एक नामवंत नाव म्हणजे गायिका योगिता गोडबोले. या नावाची ओळख करून द्यायची झाली तर आला होळीचा सण लय भारी (लय भारी), अग बाई अर्रेच्या मधील प्रभात गीत किंवा हिंदी सिनेमा ट्रॅफिक सिग्नल मधील, ना जिस दिन तेरी मेरी बात होती है… ही आणि या सारखी अनेक  हिट गाणी तिने गायली आहेत. मुख्यतः अजय अतुल सोबत तिने केलेलं काम उल्लेखनीय आहे.अशी हि गुणी गायिका तिचे नवीन रोमँटिक गाणे “ही आठवण” प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली.

 

या गाण्याचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे, सत्य घटना आणि समाजाशी निगडीत विषयांवर चित्रपट बनविण्यास प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधुर भांडारकर हह्यांनी योगिताच्या गाण्याचे प्रकाशन केले. सध्या हिंदी सिनेविश्वात मराठी गायक-गायिकांना फारश्या संध्या मिळत नाहीत. मात्र भाषेपलीकडे जाऊन कलेला प्राधान्य देणारा दिग्दर्शक म्हणूनच मधुर भांडारकर यांची एक वेगळी ओळख आहे. ट्रॅफिक सिग्नल हा मधुर भांडारकर यांचा एक गाजलेला सिनेमा. त्यातील अनेक गाणी प्रसिद्ध होती. मात्र एक गाणे मधुर भांडारकर यांचे आवडते आहे ते म्हणजे “ना जिस दिन तेरी मेरी”. आणि हे गाणे मधुर यांनी योगिताकडून गाऊन घेतेले होते. योगिताच्या गायकीचा पूर्ण अंदाज मधुर यांना आहे आणि त्यामुळेच तिच्या या नवीन गाण्याचे प्रकाशन करण्यासाठी मधुर भांडारकर योगिताच्या एका विनंतीला मान देउन तिथे उपस्तित होते.

या प्रसंगी मधुर भंडारकर यांनी योगिता बद्दल सांगितले, कि “मी योगिता आणि तिच्या संपूर्ण टीम च ‘ही आठवण’ या सुंदर गाण्याबद्दल अभिनंदन करतो, त्यांनी ज्या प्रकारे एवढे सुंदर गाणे बनवले आहे आणि ज्या प्रकारची ट्रीटमेंट दिली आहे ती फारच सुंदर आहे. ही आठवण हे गाणे योगिता सुंदर गायली आहेच पण मी आश्चर्यचकित आहे तिचे अभिनय कौशल्य बघून. योगीताने सिंगल गाणे बनवून एक चांगली सुरुवात केली आहे आणि मला खात्री आहे हा प्रवास तिला खूप उंचीवर नेईल”.

राहुल पाठक हे या गाण्याचे निर्माते आहेत. योगिता गोडबोले यांचे “ही आठवण” हे गाणे, एक रोमँटिक सॉंग असून, एका प्रेमिकेची विरह भावना आणि  प्रियकराच्या भेटीचं सुंदर वर्णन यात दाखवले गेले आहे. हे गाणे पावसातील नयनरम्य वातावरणात पुण्यात शूट केले आहे. वैभव जोशी यांनी ह्या गाण्याचे बोल लिहिले असून सौरभ ऋषिकेश आणि जसराज या प्रसिद्ध संगीतकारांनी संगीतबद्द केले आहे. श्रेयस शिंदे हे या गाण्याचे सिनेमटोग्राफर आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...