पुणे- पूर्वीच्या काळात दवंडी देवून नागरिकांना सूचना करण्यात येत, आता अशाच काही स्वरूपाच्या पद्धतीने नागरी भागात जावून गर्दी न होईल याची दक्षता घेऊन नगरसेवक योगेश ससाने यांनी ‘ मी नागरिकांच्या सेवला ,करोनालाच पोहोचवु नरकाला ‘ असा उपक्रम सुरु केला आहे.
हडपसर परिसरांत गेली रविवार पासुन नगरसेवक योगेश ससाणे स्वत: माईक स्पीकर व LED VAN घेऊन सोसायटी , हिंगणेमळा ससाणेनगर , काळे बोराटे नगर मधील एकुनएक गल्ली , वस्ती , सोसयटी
मध्ये जाऊन कोरोना व्हायरस बाबत नागरिकांमधये जनजाग्रुती करीत आहेत ,
अफवांवर विश्वास ठेऊ नका ,मनपा दवाखाने – नायडू हाॅस्पीटल , कमाल नेहरुं दवाखाना येथे कोरोना वर मोफत उपचार व तपासणी चालु आहे , लहान मुले व जेष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी , मनपा व स्वत योगेश ससाणे आपल्या सेवे साठी २४ तास उपलब्ध आहेत , सॅनिटायझर व मास्क च्या मागे लागण्यापेक्षा हातरुमाल व साबन वापरावा , लहान मुलांना मोकळा वेळ आहे म्हनुन पालकांनी मुलांना मोबाईल व गेम खेळायला लावण्या पेक्षा मुलांना आपल्या इतिहासाची पुस्तके आणुन देऊन त्यांना वाचण्याची आवड निर्माण करावी अशी विनंती केली
अशा प्रकारे “सुचना “ वजा “दवंडी “ स्वतः नगरसेवक योगेश ससाणे सकाळी तीन तास व रात्री ६ ते १० पर्यंत जागोजागी जाऊन करीत आहेत
आज पंडीत जवाहरलाल नेहरु भाजी मंडई मध्ये देखील आज नागरिक व व्यापारी बांधवा मध्ये जनजाग्रुती केली तसेच हडपसर भाजी मंडई पुढील ३१ मार्च पर्यंत प्रत्येक दोन दिवस सलग चालु ठेऊन एक दिवस बंद करण्याचा निर्णय व्यापारी व योगेश ससाणे यांनी घेतला आहे , तशी सुचना मनपा उपायुक्त माधव जगताप यांना योगेश ससाणे यांनी फोन करुन दिली आहे व नागरिकांना अवाहन केले आहे की नागरिकांनी बाजार बंद बाबत नोंद घेण्याची विनंती केली आहे
शनिवार दि २१ मार्च मार्केट चालु
रविवार दि २२ मार्च मार्केट बंद
सोमवार दि २३ मार्च मार्केट चालु
मंगळवार दि २४ मार्च मार्केट चालु
बुधवार दि २५ मार्च मार्केट बंद
गुरुवार दि २६ मार्च मार्केट चालु
शुक्रवार दि २७ मार्च मार्केट चालु
शनिवार दि २८ मार्च मार्केट बंद
रविवार दि २९ मार्च मार्केट चालु
सोमवार दि ३० मार्च मार्केट चालु
मंगळवार दि ३१ मार्च मार्केट बंद
या प्रमाणे भाजी मंडई चे चालु-बंद चे नियोजन ठरवले आहे