‘यशस्वी’ संस्थेच्या वतीने पर्यावरण जनजागृती
पिंपरी : चिंचवड येथील ‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने नुकत्याच आलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरणविषयक जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आपल्या सभोवताली अगदी सहज मिळणारी स्वच्छ हवा,सुर्यप्रकाश, पाणी याचे महत्व आपल्याला नसल्यामुळेच आज या सगळ्या गोष्टी प्रदूषित व्हायला लागल्या आहेत. आपण प्रत्येकाने फक्त स्वतः पुरता आणि स्वतःच्या कुटुंबापुरता जरी पर्यावरणाला हानी न पोहोचवण्याचा निर्णय घेतला तरी सुद्धा खूप मोठा फरक दिसून येईल. यासाठी प्रत्येकाने पर्यावरणाप्रती जागरूक होणे ही काळाची गरज आहे.
तर यावेळी बोलताना यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सचे संचालक संजय छत्रे यांनी सांगितले की, पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थीदशेपासूनच प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुनर्वापर प्रक्रियेबद्दलही त्यांनी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी संस्थेच्या प्रांगणात कुंड्यामधून फुलझाडे लावण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रा. अनन्या नाईक,पवन शर्मा, अभिजित चव्हाण, इंद्रजित माळी,प्रा. उर्मिला सातपुते,प्रा. प्रियंका साळुंखे, आदिती चिपळूणकर यांच्यासह संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रा. क्षितिजा देशपांडे – जेऊरकर यांनी केले.