नोकरी मेळावा उपक्रम कौतुकास्पद – महापौर नितीन काळजे

Date:

पिंपरी –
नोकरी मेळावा हा उपक्रम निश्चित कौतुकास्पद असून एकाच ठिकाणी अनेक आस्थापनांच्या रोजगार संधी
उपलब्ध झाल्यामुळे युवकयुवतींना देखील अशा उपक्रमांमुळे विविध प्रकारच्या रोजगार संधी उपलब्ध होतात
असे मत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.
ते शनिवारी(दिनांक १३ जानेवारी २०१८) चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्
यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आय आय एम एस)च्यावतीने आयोजित नोकरी मेळाव्याचे उदघाटन करताना
बोलत होते.
संपूर्ण राज्यात औद्योगिक नगरी म्ह्णून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्
याविविध कंपन्यांमध्ये सातत्याने विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतात.
अशावेळी एकाच छताखाली या रोजगारसंधी बेरोजगार युवकयुवतींना उपलब्ध व्हाव्यात म्हणून ‘यशस्वी’
संस्थेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेला हा नोकरी मेळावा उपक्रम दरवर्षी घेण्यात यावा. तसेच या मेळा
व्याचे स्वरूप आणखी मोठे व्हावे याकरिता आवश्यक ते सहकार्य पालिका प्रशासनाकडून करण्यासाठी आपण
निश्चित प्रयत्न करू असे आश्वासनही महापौर नितीन काळजे यांनी केले.
याप्रसंगी संस्थेच्या संचालक प्रा. भाग्यश्री कुंटे यांनी महापौरांना’;यशस्वी’; संस्थेच्यावतीने राबविण्यात येत
असलेल्या एमबीए व अन्य कौशल्य विकास अभयसक्रमांविषयी सविस्तर माहिती सांगितली.तसेच प्रधानमंत्री
कौशल्य विकास योजना अर्थात पीएमकेव्ही वाय अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध मोफत कौशल्य विकास
प्रशिक्षण कार्यक्रमांची माहितीही सांगितली.
या नोकरी मेळाव्यासाठी डब्ल्यू एन एस, युरेका फोर्ब्स, बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स, महिंद्रा सान्यो,
वेरॉक लायटनिंग, एमफसिस,टाटा टेली सर्व्हिसेस, बजाज फिनसर्व्ह, एचडीबी फायनान्सशियल सर्व्हिसेस,
पार्ले ऍग्रो, जस्ट डायल, दलाल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंट जर्नल, रिलायन्स रिटेल, आयटीएम, विस्टेरिया रिअल व्हिजन
,स्पेस इंडिया नेस्ट यांच्यासह एकूण ३० हुन जास्त कंपन्यांच्या विविध नोकरीच्या संधी या मेळाव्यात उपलब्ध
करून देण्यात आल्या होत्या.
या नोकरी मेळाव्याला सुमारे पाचशेहुन जास्त युवकयुवतींनी सहभाग नोंदवला तर प्राथमिक स्तरावर ३५०
जणांची निवड होऊन त्यांना रोजगार संधी देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला सहभागी कंपन्यांचे मनुष्यबळ व्यवस्थापक, यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल
इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आय आय एम एस)च्या संचालक प्रा. भाग्यश्री कुंटे, अभिषेक कुलकर्णी,
संस्थेचे सर्व अध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे ग्रंथपाल पवन शर्मा, प्रा. आशा महाजन, प्रा.मुक्ता केसकर, डॉ. दीप्ती लेले,
प्रा.अमर गुप्ता,प्रसाद शाळीग्राम, राजेंद्र शेळके,आदिती चिपळूणकर आदींनी विशेष सहकार्य केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....