आंतर आयटी क्रिकेट 2017-18 स्पर्धेत इन्फोसिस संघाचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश

Date:

पुणे- आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट  2017-18 स्पर्धेत इन्फोसिस संघाने यार्डी संघाचा १४०धावांनी पराभव करून उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत इन्फोसिस संघाने प्रथम फलंदाजी करताना २०षटकात ४बाद २४३धावा केल्या. यात प्रभजोत मल्होत्रा ७१, संदीप शांघाई ६७, आशय पालकर नाबाद ५२, साईनाथ शिंदे ३१यांनी धावा काढून संघाला २४३ अशी भक्कम धावसंख्या उभारून दिली. याच्या उत्तरात यार्डी संघाला २०षटकात ७बाद १०३धावापर्यंतच मजल मारता आली. पार्थ शहाच्या ४५धावा, गौतम तुळपुळेच्या २६धावा वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही. इन्फोसिसकडून भास्कर श्रीवास्तव(२-१७), रवी थापलियाल(२-२१), करण पांड्या(२-२४)यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. सामन्याचा मानकरी संदीप शांघाई ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उप-उपांत्यपूर्व फेरी:

इन्फोसिस: २०षटकात ४बाद २४३धावा(प्रभजोत मल्होत्रा ७१, संदीप शांघाई ६७, आशय पालकर नाबाद ५२, साईनाथ शिंदे ३१, प्रमोद दवंडे २-४१)वि.वि.यार्डी: २०षटकात ७बाद १०३धावा(पार्थ शहा ४५, गौतम तुळपुळे २६, भास्कर श्रीवास्तव २-१७, रवी थापलियाल २-२१, करण पांड्या २-२४);सामनावीर-संदीप शांघाई; इन्फोसिस १४०धावांनी विजयी.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाश्चात्य संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत आणि नृत्यातून वेगळा आनंद मिळतो

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भावना पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे...

सोशल मीडियावर औरंगजेबाचं समर्थन: पुण्यात दोघांवर कारवाई

पुणे-राज्यभरात औरंगजेबच्या कबरवरुन राजकीय वाद सुरु असतानाच त्याचे गंभीर...