पुणे-
गेल्या ५ वर्षांपासून- शहरात नारायणदास फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या-प्रतिक नितीन गुजराथी यांची भा. ज. पा. विद्यार्थी आघाडी, पुणे शहर संपर्कप्रमुख पदी नुकतीच निवड करण्यात आली.
पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष दिपक पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र, राज्य सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी तसेच शहरातील विद्यार्थी हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहाणार असल्याचे प्रतिक नितीन गुजराथी यांनी सांगितले.