‘ लव्ह हॅज नो टॅग ‘ अॅड फिल्मला बेस्ट ऍड फिल्म अवॉर्ड ‘ योगेश देशपांडे यांच्या ‘रिडिफाइन कन्सेप्ट्स’चे यश
पुणे :
इंडियन सिने फेस्टिव्हल २०२२ मध्ये पुण्याच्या ‘रिडिफाइन कन्सेप्ट्स’ निर्मित ‘ लव्ह हॅज नो टॅग’ या जाहिरातपटाला ‘बेस्ट ऍड फिल्म अवॉर्ड’ मिळाले आहे.’रिडिफाइन कन्सेप्ट्स’ संस्थेचे संचालक,लेखक-दिग्दर्शक योगेश देशपांडे यांना ‘डॅडीज गर्ल ‘ जाहिरातपटासाठी ‘ बेस्ट डिरेक्टर ऑफ द यीअर ‘ हा पुरस्कार मिळाला आहे. ‘मिनी बॉक्स ऑर्गनायझेशन’ आयोजित फेस्टिव्हलचे हे दहावे वर्ष होते.६० देशातून ४६० प्रवेशिका आल्या होत्या.त्यातून ही निवड करण्यात आली.
पीएनजी ज्वेलर्स यांच्यासाठी तयार केलेल्या ‘ लव्ह हॅज नो टॅग ‘ या जाहिरातपटामध्ये लेखन,दिग्दर्शन योगेश देशपांडे यांनी केले असून कुंजिका काळविंट, बीना सिध्दार्थ, ज्योती सुभाष या कलाकारांनी त्यात अभिनय केला आहे. ‘ डॅडीज गर्ल ‘ मध्ये तेजस्विनी पंडित, उदय टिकेकर यांनी प्रभावी काम केले आहे.
हळुवार नात्यांना स्पर्श करणारी ‘प्रथा ‘!‘लव्ह हॅज नो टॅग’ मध्ये सासरी नांदायला गेलेल्या नववधूला सासूबाईंचे प्रेम कसे मिळते हे पाहायला मिळते.योगेश देशपांडे यांच्या आवाजातील पार्श्वगायन या नात्याला अजून गहिरे करते.’डॅडीज गर्ल’मध्ये आईविना जगलेल्या मुलीला सासरी पाठविताना पित्याची होणारी घालमेल उदय टिकेकर यांच्या अभिनयातून दिसून येत आहे.खंबीर वाटणाऱ्या,पण मनाने हळव्या पित्याला जपणारी मुलगी तेजस्विनी पंडित यांच्या रूपाने ‘डॅडीज गर्ल’ मध्ये पाहायला मिळते.पीएनजी ज्वेलर्स यांच्या दागिन्यांना या दोन्ही जाहिरात पटातून भावूक कोंदण मिळते.