पुणे- महापालिका प्रशासकीय काळात कचरा,पाणी ,यासह नागरी समस्या उग्र रूप धरण करू पाहत असल्याने आज यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी महापलिकेत जाऊन आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली .त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या ,’अजितदादा पालकमंत्री असताना दर आठवड्याला जिल्ह्यातील प्रश्ना बाबत आढावा बैठक होत होती. परंतु दुर्दैवाने मागील अडीच महिन्यापासून जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने आढावा बैठक होत नाही. खडकवासला भागात येणारा धायरी,वारजे परिसरात कचर्याचे ढीग वाढले आहेत.तर दुसर्या बाजूला पाणी कपात देखील सुरू केली आहे.अशा तक्रारी नागरिकांमार्फत येत आहे. आपल्या शहराला पाणी पुरवठा करणारी धरण पूर्ण भरली असताना पाणी कपात का होत आहे ? हे समजत नाही, पावसाने पुण्याची आणि रस्त्यांची अवस्थाही खडतर करून टाकली आणि अशा स्थितीत जबाबदारी कोण घेणार ,लोकांनी कुणाकडे जायचे ?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना कार्यकारिणीमधून डावलण्यात आलं आहे का त्यावर त्या म्हणाल्या की,नवाब मलिक यांना अजिबात डावलण्यात आलेल नाही.माझे त्यांच्या मुलींशी रोज बोलणे होते. तसेच नवाब भाईना डावललं नाही आणि डावललं जाणार नाही.त्याच बरोबर अनिल देशमुख,नवाब मलिक,संजय राऊत यांच्या कुटुंबियांसोबत सतत मी संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.अर्थमंत्री निर्मला सीतारामन मतदार संघात येणार असल्याने काय अपेक्षा आहेत. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की,माझी दिल्ली येथे निर्मला सीतारामन यांच्या सोबत अनेक वेळा भेट होत राहते. मागील वेळेस देखील म्हणाले होते की,आपण जर या भागात येत असला तर आम्ही मनापासून तुमचे स्वागत करतो. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन माझ्या मतदारसंघात येत असल्याने खूप आनंद होत आहे. तसेच अरुण जेटली देखील बारामतीमध्ये आले होते. ते गोविंद बागेत राहिले होते. त्यावेळी देखील अतिशय चांगला कार्यक्रम झाला होता. अरुण जेटली कृषी केंद्राला भेट दिली होती.त्यामुळे निर्मला सितारामन यांनी बारामती मतदार संघात अनेक संस्था चांगल्या काम करीत आहे त्या सर्वांना त्यांनी निश्चित भेट द्यावी आणि त्या पाहण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करीत असल्याचे त्यांनी सांगितले.