Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

दलित पँथरच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी यशवंत नडगम यांची नियुक्ती

Date:

दलित पँथरच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी यशवंत नडगम यांची नियुक्ती करण्यात आली , या नियुक्तीचे पत्र दलित पँथरचे  अध्यक्ष मल्लिका नामदेव ढसाळ यांनी नियुक्तीपत्र देउन केली . दलित पँथरच्या केंद्रीय  कार्यकारिणीच्या बैठकीत हि निवड करण्यात आली . त्यावेळेस केंद्रीय अध्यक्ष अशोक माने तसेच दलित पँथरचे  महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अल्ताफ सय्यद , उपाध्यक्ष बाळासाहेब पडवळ , मुंबई अध्यक्ष प्रताप रावत, पुणे शहर अल्पसंख्याक विभागाचे  अध्यक्ष इलियास शेख व  बहुसंख्येने दलित पँथरचे पदाधिकारी व पँथर्स उपस्थित होते .

   यशवंत नडगम हे दलित पँथरच्या चळवळीत गेली अनेक वर्षांपासून कार्यरत असून त्यांनी पँथरच्या अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे . त्यांनी   सुशिक्षित बेरोजगारांचा मोर्चा , दलित पॅन्थरचे वर्धापन दिन , आरक्षणावर विविध आंदोलने  , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळा , विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलने त्यांनी केलेली आहेत . दलित पॅंथर्सचे संस्थापक पदमश्री नामदेव ढसाळ यांच्यानंतर दलित पँथरची संपूर्ण चळवळ महाराष्ट्रात वाढविण्या यासाठी त्यांनी महत्वपूर्ण कार्य केले . रेल्वे लगतच्या सर्व झोपडपट्ट्या वाचविण्यासाठी वारंवार रेल्वे विरोधात  दलित पँथरच्या माध्यमातून आंदोलन उभारून झोपडपट्टया वाचविल्या आहेत .  महिलांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात त्यांना न्याय मिळण्यासाठी प्रत्येक जिल्हयात जलदगतीने न्यायालय  उभारणीसाठी महत्वपूर्ण काम केले आहे . प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतंत्र महिला कक्ष स्थापना करण्यासाठी आंदोलन केले . क्रीडा क्षेत्रात त्यांनी दरवर्षी पँथर्स चषक हि मुलींची फुटबॉल स्पर्धेचे ते आयोजन करतात . सायकल स्पर्धा , स्केटिंग स्पर्धा आदीं क्रीडा स्पर्धांचे  आयोजन केलेले आहे .

  दलित पँथरच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी यशवंत नडगम यांची नियुक्तीनंतर त्यांनी सांगितले कि दलित पॅंथर्सचे संस्थापक पदमश्री नामदेव ढसाळ यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दलित पँथरच्या छावण्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उभारणार असून त्यांच्या माध्यमातून समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी संविधानात्मक दलित पँथर स्टाईलने आंदोलन करून वाचा फोडण्याचे काम करणार आहे . आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात दलित पँथरच्या माध्यमातून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सामान्य व गरीब व्यक्तींच्या सुखान्ताचा ग्राफ वाढवावा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

श्री सरस्वती कराड हॉस्पिटलचे उद्घाटन‘केअर’, ‘क्युअर’ व ‘हील’ तत्वांशी...

दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप च्या पुनरागमनाची चाहूल

पुणे- दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप...

रसिकांची दाद कलाकारांना सुखावते : पं. सुहास व्यास

पंचामृत संगीत कला प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कलाकारांचा गौरव डॉ. श्याम गुंडावार,...

डॉ. दीपक हरके यांना अमेरिका, बोस्टन येथील ग्लोबल युनिव्हर्सिटीची ॲानररी डॅाक्टरेट

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते सन्मानित पिंपरी, पुणे...