राष्ट्रवादीने पुण्याला दिलं तरी काय ? पुन्हा एकदा जगतापांना बिडकरांचा सवाल (व्हिडिओ)

Date:

पुणे- राज्य सरकारने महामारीच्या काळात काम करणाऱ्या महापालिकेला  फुटकी कवडी दिली नाही असा आरोप करणाऱ्या सभागृहनेते गणेश बिडकर यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उत्तर  दिल्यानंतर पुन्हा त्यावर बिडकर बरसले आहेत .पुणे महापालिका हि अ वर्गातील महापालिका आहे तिला राज्य सरकारच्या मदतीची गरजच काय असे सांगत मदत मागितली असती तर निश्चित दिली असती असे हि उत्तर देत राज्य सरकारने पुण्यातील सरकारी दवाखान्यांना केलेल्या औषध पुरवठ्याची यादी माध्यमांना सादर केली होती . आज त्यावर बिडकर यांनी जगतापांना माहिती नाही काय ? महामारी, साथीचे रोग यावर काम करणे ही कायद्याने  महापालिकेची नाही तर राज्य सरकारची जबाबदारी आहे .तरीही आम्ही कधी त्याबाबत बोललो नाही त्यांनी दिलेल्या यादीचा आम्ही समाचार घेऊच …पण पुण्याला गेल्या दीड वर्षात राष्ट्रवादीने दिले तरी काय ? असा सवाल पुन्हा एकदा करत .. जगताप यांना आमचे म्हणणे मान्य करावेच लागणार आहे ,प्रसिद्धीसाठी, राजकारणासाठी ते काहीही बोलत असतात असेही बिडकर यांनी म्हटले आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यात

‘मास्मा रिन्यूएबल एनर्जी एक्स्पो’ १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान पुणे, ...

केंद्र सरकारच्या कामगार कायद्याविरोधातील उद्याच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा पाठिंबा.

मुंबई, दि. ११ फेब्रुवारी २०२६ केंद्रातील भाजपा सरकारने कामगार कायद्यात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जनतेची फसवणूक, वीज स्वस्त नाही तर १६% ने महाग होणार: अतुल लोंढे

महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक, तेलंगणा, गुजरातमधील वीज दर स्वस्त कसे, अदानीच्या...