करोनाचं संकट अत्यंत गंभीर,सूचनांचे पालन केले नाही तर दीर्घकालीन परिणाम भोगावे लागतील – शरद पवार

Date:

राज्य सरकार, केंद्र सरकार, राष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना यांनी काही निर्णय तातडीने घेतले आहेत. करोनाचं संकट लक्षात घेऊन आपण हे सगळं करतो आहोत हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. करोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं, देशातील अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होणार आहे यात काहीही शंका नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला.  करोनाशी लढा आपण एकत्रितपणे देऊ. सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन करा असंही आवाहन शरद पवार यांंनी केलं.

अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना अडवू नका असंही आवाहन शरद पवार यांनी पोलिसांना केलं. संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी सर्व शक्ती वापरा असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. द्राक्षं आणि आंबा उत्पादकांना सरकारने मदत करावी असंही आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. ईएमआयबाबत सरकारने विचार करावा, फळबागांच्या नुकसानीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. सगळ्या कंपन्यांनी कामगारांचे पगार कापू नयेत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आपल्या राज्यातले आरोग्य कर्मचारी, पोलीस हे जीवावर उदार होऊन काम करत आहेत. त्यांना घराबाहेर न पडून सहकार्य करा. राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करा असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवसेना उबाठा पक्ष: पुण्यातील शहर नेतृत्वात फेरबदल होण्याचे संकेत

“संघटना हीच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे...

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...