सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय आणि मिलिटरी इंटेलिजन्स स्कुल आणि डेपोला दक्षिण कमांडच्या प्रमुखांनी दिली भेट

Date:

पुणे, 30 एप्रिल 2022

लेफ्टनंट जनरल जे एस  नैन, पीव्हीएसएम , एव्हीएसएम  एसेम , जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ दक्षिण कमांड यांनी 30 एप्रिल 2022 रोजी पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी ) आणि  मिलिटरी इंटेलिजन्स स्कुल  आणि डेपोला (एमआयएनटीएसडी )  भेट दिली.

एएफएमसीच्या भेटीदरम्यान त्यांनी महाविद्यालयातील प्राध्यापकांशी संवाद साधला आणि   त्यांच्या जबाबदारीच्या क्षेत्रांतर्गत सैनिकांचे   बळकट  शारीरिक आणि मानसिक आरोग्य   सुनिश्चित करण्यासह वर्षानुवर्षे सक्षम वैद्यकीय आणि रुग्णसेवा क्षेत्रात पदवीपूर्व  आणि पदव्युत्तर मनुष्यबळ  तयार करून लष्करी वैद्यकीय नेतृत्वाला सहाय्य करत असल्याबद्दल प्रशंसा केली.

एएफएमसीच्या दौऱ्याचा एक भाग म्हणून त्यांनी कौशल्य प्रयोगशाळेला भेट दिली , या प्रयोगशाळेत  वैद्यकीय प्रशिक्षणासाठी सिम्युलेटर, मॅनेक्विन्स आणि अत्याधुनिक उपकरणे आहेत.अॅडव्हान्स कार्डियाक लाइफ सपोर्ट (एसीएलएस) अभ्यासक्रम शिकत असलेले  छात्र  तसेच वैद्यकीय आणि परिचर्या  अभ्यासक्रमांच्या छात्रसैनिकांशीही त्यांनी संवाद साधला.आणि त्यांना अभ्यास आणि अभ्यासेतर उपक्रमांवर  पुरेसा भर देऊन सर्वांगीण विकासासाठी  प्रेरित केले.

लष्कर कमांडर यांनी, गुप्तवार्ता क्षेत्राशी संबंधित सर्व पैलूंवर लष्करी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी उत्कृष्टता केंद्र असलेल्या आणि सर्व सेवा, निमलष्करी दले आणि मैत्री असेलल्या देशांमधील सशस्त्र दलातील जवानांना प्रशिक्षण देणाऱ्या मिलिटरी इंटेलिजन्स स्कुल  आणि डेपोला देखील भेट दिली.

याठिकाणी आयोजित केलेल्या नियोजनबद्ध  आणि प्रभावी प्रशिक्षणाचे जनरल ऑफिसर यांनी  प्रशंसा केली.  या प्रशिक्षणात   नवीन  आणि प्रशासकीय व्यवस्थेसंदर्भात सातत्याने केले जाणारे  प्रयत्न आणि उपक्रम  यांचा समावेश आहे. त्यांनी या प्रशिक्षण केंद्राचा दर्जा वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न जाणून घेतले आणि सशस्त्र दलांच्या प्रमुख प्रशिक्षण संस्थांपैकी एक म्हणून एमआयएनटीएसडीची स्थापन केल्याचे सांगत आपल्या दौऱ्याचा  समारोप केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...