विश्व हिंदू परिषद पूर्व पुणेतर्फे जावेद अख्तर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

Date:

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे समर्थन करणारे लोकही तालिबानी मानसिकतेचे आहेत, असे विधान करणा-या प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या प्रतिमेला विश्व हिंदू परिषद पूर्व पुणे विभागातर्फे जोडे मारुनआंदोलन करण्यात आले. जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्याकरीता मंडईतील टिळक पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाला विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत विशेष संपर्कप्रमुख किशोर चव्हाण, मठमंदिर संपर्क प्रमुख मनोहर ओक, प्रांत सदस्य श्रीकांत चिल्लाळ, पूर्व पुणे विभाग मंत्री धनंजय गायकवाड, विभाग सहमंत्री संतोष अनगोळकर, कसबा भाग मंत्री गणेश वनारसे, सहमंत्री महेश अमराळे, मातृशक्ती प्रमुख सरिता अंबिके, ओंकार नाईक, कुणाल जगताप, प्रकाश रेड्डी आदी उपस्थित होते.

किशोर चव्हाण म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाची तुलना जावेद अख्तर यांनी तालिबानींशी केली आहे. राष्ट्र प्रथम ही या संघटनांची विचारधारा आहे. तिन्ही संघटनांनी रस्त्यावर उतरुन वेळोवेळी समाजासाठी कार्य केले आहे, याची माहिती अख्तर यांना दिसत नाही. कोविड काळात देखील या संघटनांचे मोठे काम सर्वांनी पाहिले आहे. जे घराबाहेर कधीच पडले नाहीत, त्यांनी अशी वक्तव्ये करणे चुकीचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पालघरमध्ये 13 वर्षीय मुलीवर अत्याचार,भोंदू नराधमांना कायद्याचा धाक उरला नाही – रोहित पवार

मुंबई-पालघर जिल्ह्यातील एका भोंदूबाबाने औषध देण्याच्या बहाण्याने एका 13...

PMRDA च्या कारवाईने अनधिकृत होर्डिंगधारकांचे धाबे दणाणले! पुण्यात मात्र राजकारणाने उखळ पांढरे

हवेली, भोरमध्ये अनधिकृत होर्डिंगवर ‘पीएमआरडीए’चा हातोडा! दोन दिवसांच्या मोहिमेत...

आता तरी गावांना न्याय द्या -आपले पुणे आपला परिसर

पुणे-पी एम आर डी ए च्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी...

सत्तेच्या हव्यासाने महाराष्ट्र भरकटला: कायद्याचा धाक संपलाय-नसरापूर घटनेवर राज ठाकरे संतप्त

मुंबई-पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या चिमुकलीवरील अत्याचार...