कोकणात गणेशोत्सवात जाणा-या चाकरमान्यांसाठी भाजपच्या कोकण विकास आघाडी मार्फत मोफत बस

Date:

मुंबई- कोकणात गणेशोत्सवात जाणा-या चाकरमान्यांसाठी भाजपच्या कोकण विकास आघाडी मार्फत खास मोफत बसची सुविधेचे लोकार्पण आज विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबई ते सावंतवाडी मोफत बस सेवेला प्रविण दरेकर यांनी हिरवा झेंडा दाखविला. या अभिनव उपक्रमाचे दरेकर यांनी कौतुक केले.भाजपचा झंझावात जो कोकणात मोठ्या दिमाखात सुरू झाला आहे तो वाढविण्याचे व टिकविण्याचे काम अशा उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे हे उल्लेखनीय असल्याचे दरेकर यांनी सांगितले. मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणात गणपतीसाठी जातो पण अनेकांना ट्रेन चे तिकीट मिळत नाही,एसटी पण फुल्ल होतात।अशा वेळी भाजपने कोकणात जाण्यासाठी अशी सेवा सुरू करून एक उत्तम आदर्श घालून दिल्याचेही दरेकर यांनी सांगितले. केंदीय मंत्री नारायण राणे यांच्या कोकणातील जन आशीर्वाद यात्रेमुळे कोकणात नव चैतन्य निर्माण झाले आहे.हे चैतन्य असेच आता सुरू राहणार असून कोकण लवकरच भाजपचा बालेकिल्ला होईल असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.या प्रसंगीं प्रकाश (दादा) पवार,शलाका साळवी, सचिन शिंदे, आनंद धुमाळेस,सचिन शिरवडकर, विशाल (बबन) तोडणकर, नारायण पवार, सूर्यकांत धुरी,रमेश कदम,प्रकाश गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रात्रीच्या वेळी एक तरुणी पोलीस ठाण्यात आली…अन महिला पोलिसानेच तिला बुधवारात पोहोचवले ..

पोलीस आणि कुंटणखाणा मालकिणीचे संगनमत - महिला पोलीस निलंबित...

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनामुळे ३०५ एकरांवर होणार फळबाग व देशी वृक्षलागवड

हर्बालाइफ व फार्मर्स फॉर फॉरेस्ट यांच्यात सामंजस्य करार मुंबई, दि....

महापालिकेच्या ४ शाळांना CSR द्वारे मिळणार स्टेम लॅब

पुणे- महापालिकेच्या ४ शाळांना CSR उपक्रमांतर्गत स्टेम लॅब देण्यात...