पुणे-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे विजयी झाले आहेत.माजी नगरसेवक ,माजी खासदार असलेल्या अनिल शिरोळे यांचे पुत्र असलेले सिद्धार्थ यांनी पहिल्याच प्रयत्नात पहिल्यांदाच लढलेल्या विधानसभा निवडणुकीत यासह संपादन केले आहे.
या लढतीमध्ये शेवटच्या फेरीपर्यंत सिद्धार्थ शिरोळे यांनी आघाडी घेतली होती. 18 व्या फेरीत त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यावर आघाडी घेतली. तर 19 व्या फेरीत विजयी आघाडी घेत विजय संपादीत केला. शिरोळे यांनी 5 हजार पेक्षा अधिक मतांनी बहिरट यांचा पराभव केला. पहिल्या फेरीमध्ये दत्ता बहिरट हे आघाडीवर होते. त्यांना 308 मते मिळाली होती. पहिली फेरीत पोस्टल मतांची मोजणी झाली.
या मतदार संघामध्ये तीन लाख पाच हजार 587 मतदार आहेत. एक लाख 33 हजार 772 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघातील औंधमधून 52 टक्के, प्रभात रस्ता, आपटे रस्ता, सेनापती बापट रस्ता परिसरातून 51 टक्के मतदान झाले होते.