Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

“व्हेंटिलेटर” या सिनेमाचे “जय देवा” गाणे अनिल कपूरच्या हस्ते प्रदर्शित

Date:

 

dsc_8460 dsc_8475

मराठी सिनेसृष्टीतील मातब्बर मंडळींचा लवाजमा घेऊन पद्मश्री प्रियांका चोप्रा तिच्या मराठी पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. बॉलिवूड टू हॉलिवूड सफर करणाऱ्या प्रियांकाची चित्रसंस्था पर्पल पेबल पिक्चर्स धमाल कौटुंबिक विनोदी चित्रपट व्हेंटिलेटर मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. फरारी की सवारी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या राजेश मापुसकरांचेही हे मराठी पदार्पण आहे.

काही दिवसांपूर्वी या सिनेमातील दोन गणपतीच्या गाण्यांचा ऑडियो लाँच करण्यात आला होता. नुकतंच या सिनेमातील जय देवाया गाण्याचा विडियो सुप्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांच्या हस्ते लाँच करण्यात आला. मुंबईच्या अंधेरीच्या राजादरबारी हा सोहळा संपन्न झला. यावेळी चित्रपटाचे संगीतकार रोहन – रोहन यांच्याबरोबरीने  गणेश चंदनशिवे यांनी हे गाणे प्रेक्षकांसमोर सादर केले. अंधेरीच्या राजावर देसी गर्ल प्रियांकाची अढळ श्रद्धा आहे. याच श्रध्देपायी आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचं पहिलं गाणं हे अंधेरीच्या राजासमोर ढोल ताशांच्या गजरात तिने अर्पण केले आहे. यावेळी या चित्रपटातले कलाकार जितेंद्र जोशी उपस्थित होते. यावेळी बोलताना कामेरकर कुटुंबीयांची ही कथा असून अगदी 3 वर्षांच्या बाळापासून ते घरातल्या प्रौढ व्यक्तीपर्यंत सगळ्यांनाच आपलंसं करणारा हा परिवार असल्याचे जितेंद्र जोशी यांनी म्हटले.
जय देवा गाण्याची स्तुती सगळ्यांनीच केली. त्यात पद्मश्री प्रियांका चोप्रा स्वत: उपस्थित नसली तरी विडियोच्या माध्यमातून गणरायाला नमन करत तिने या चित्रपटाला याच्या गाण्यांना बाप्पाचा आशिर्वाद लाभो आणि प्रेक्षकांचे भरभरून प्रेम या चित्रपटाला मिळो अशी प्रार्थना केली. दरम्यान अनिल कपूर यांच्या उपस्थितीसाठी तिने त्यांचे आभार ही मानले. गणपतीची स्तुती करणाऱ्या जय देवाया गाण्याचे बोल मनोज यादव यांनी लिहिले असून रिदम अरेंजर सचिन आग्रे हे आहेत.  रोहनरोहन या जोडीने या चित्रपटातल्या गाण्यांना संगीताचा साज चढवला असून रोहनरोहन जोडीबरोबर गणेश चंदनशिवे यांनी हे गाणे गायले आहे. पर्पल  पेबल पिक्चर्स निर्मित आणि झी स्टुडिओ प्रस्तुत व्हेंटिलेटर या सिनेमाची निर्मिती डॉ. मधू चोप्रा आणि प्रियांका चोप्रा यांची आहे. हिंदी सिनेसृष्टीतले नावाजलेले दिग्दर्शक राजेश मापुस्कर हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. त्यांनीच या चित्रपटाची कथा ही लिहिली आहे. या सिनेमाचा विषय कौटुंबिक असून जितेंद्र जोशी यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील मातब्बर कलाकार या सिनेमात पाहायला मिळणार आहेत

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युध्दविराम 3 दिवसांनंतर केला असता तर POK भारतात असते! अमित शहांचे ‘ते’ भाषण व्हायरल…

युध्दविरामाचा निर्णय झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियात याबाबत नाराजी व्यक्त...

कलाकार व्हा, सेलिब्रिटी नव्हे:संतोष जुवेकर

'एमआयटी एडीटी'चा 'कारी-२०२५' महोत्सव संपन्न पुणेः कलाकृती ही कलाकारापेक्षा जास्त...

नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा मोठे मुद्दे

1. ऑपरेशन सिंदूरची कारवाई फक्त स्थगित केली आहे, पण...

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...