आमदार योगेश टिळेकर यांनी ५० लाखाची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्यावर तो दाखल करणाऱ्या पोलीस अधिकार्याची बदली झाली . त्यानंतर या बदली विरोधात मोरे यांनी मोर्चा काढला होता .आज एका हॉटेल मध्ये याप्रकरणातील तक्रारदार कंपनीचा रवी बराटे यांच्या टिळेकर हे पाया पडत असल्याची व्हिडीओक्लिप व्हायरल झाल्यानंतर वसंत मोरे यांनी हे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे आणि थोडी जरी लाज असेल तर आमदारकीचा आणि भाजयुमो अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन हे प्रकरण संपवा असे हि आवाहन त्यांनी टिळेकर यांना केले आहे . पहा आणि ऐका नेमके मोरे यांनी काय म्हटले आहे .
मुख्यमंत्री साहेब,कुठवर यांची पापं पोटात घालणार- आ. टिळेकर प्रकरणी वसंत मोरेंचा सवाल
पुणे- ऑडीओक्लिप जाहीर झाली ,खंडणीचा गुन्हा दाखल झाला …आता फिर्यादी च्या पाया पडणाऱ्या भाजप आमदाराची सीसीटीव्ही क्लिप व्हायरल झाली ,मुख्यमंत्री साहेब आता कुठवर यांची पापं पोटात घालणार ,का कात्रज -कोंढवा रोड चे अनधिकृत उद्घाटन करणार ? असा सवाल मनसे चे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी केला आहे.