Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पाच शाळांमध्ये ‘प्लास्टिक कलेक्शन’ प्रकल्पाचे आयोजन विद्यार्थ्यांकडून 125 किलो प्लास्टिक कचरा जमा

Date:

पुणे :
‘वनराई ट्रस्ट’च्या वतीने ‘स्वच्छ पुणे’ या उपक्रमातंर्गत ‘प्लास्टिक आणि ई – वेस्ट फ्री’ प्रकल्पामध्ये ‘प्लास्टिक कलेक्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी या उपक्रमाचा प्रारंभ ‘महावीर इंग्लिश मीडिरम हायस्कूल’, महर्षीनगरमध्ये झाला. या उपक्रमांतर्गत सहभागी शाळांमधील विद्यार्थ्यांकडून 125 किलो प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला.
‘महावीर इंग्लिश मीडिरम हायस्कूल’ येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी बोलताना वनराईचे अध्यक्ष, रवींद्र धारिया म्हणाले, ‘पुणे शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आणि महानगरपालिकेवरील ताण कमी व्हावा यासाठी वनराईच्या पुढाकाराने व इतर संस्थांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्लास्टिक कचरा आणि ई-कचरा पर्यावरणाला घातक आहे. प्रत्येक नागरिक यामध्ये कसा सहभागी होईल, यासाठी वनराई प्रयत्न करत असते, समाजाला आपण काहीतरी द्यायला पाहिजे, हे आपले कर्तव्य आहे. याची सुरुवात विद्यार्थ्यांपासून करण्याचा आमचा मानस आहे. शाळांप्रमाणेच शहरातील सोसायट्यांमध्ये हा उपक्रम वनराईच्या वतीने राबविण्यात येणार आहे.’
या वेळी विजयकांत कोठारी (‘महावीर प्रतिष्ठान’चे कार्याध्यक्ष), अलकनंदा सेनगुप्ता (‘महावीर इंग्लिश मीडियम हारस्कूल’च्या  मुख्याध्यापक), धन्यकुमार चोरडिरा, विनीत बियाणी, सीमा बियाणी, ललित राठी (क्लीन गार्बेज), गणेश शिरोडे (एनव्हायर्मेंट क्लब ऑफ इंडिया), मुकुंद शिंदे (वनराई), राहुल काकंरिया, विनोद बोधनकर (सागर मित्र), अरूण गांधी उपस्थित होते.
‘महावीर इंग्लिश मीडियम हायस्कूल’च्या मुख्याध्यापिका अलकनंदा सेनगुप्ता यांचे या उपक्रमास मोलाचे सहकार्य मिळाले. यावेळी उपस्थितीत मान्यवरांनी विद्यार्थ्यांना ‘प्लास्टिक आणि ई-वेस्ट’ कचर्‍याविषयी मार्गदर्शन केले. नाना क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
पन्नालाल लुंकड संचलित सौ. विमलाबाई लुंकड प्राथमिक शाळा, श्रीकांत भडके म.न.पा. इंग्रजी व मराठी माध्यम शाळा क्रमांक 105 व 66 येथे देखील या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुवर्णा साठे, उज्वला सव्वाशे, रामेश्‍वर मोरे, पूनम राजपूत, पंडीतराव सातपुते (पन्नालाल लुंकड शाळेचे मुख्याध्यापक), मुकुंद जाधव, विजया सातारकर, कांचन भरणे या सर्व शिक्षकांनी उपक्रमासाठी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांकडून जमा झालेला प्लास्टिक कचऱ्याचे रिसायकलिंग करण्यात येणार आहे, असे क्लीन गार्बेजचे ललित राठी यांनी सांगितले. ‘वनराई’च्या वतीने शाळेमध्ये प्लास्टिक कचरा साठविण्यासाठी पिशव्या देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी या पिशव्यामध्ये कचर्‍याचे संकलन करायचे आहे, असेही यावेळी आवाहन करण्यात आले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सामान्य व गरीब व्यक्तींच्या सुखान्ताचा ग्राफ वाढवावा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

श्री सरस्वती कराड हॉस्पिटलचे उद्घाटन‘केअर’, ‘क्युअर’ व ‘हील’ तत्वांशी...

दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप च्या पुनरागमनाची चाहूल

पुणे- दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप...

रसिकांची दाद कलाकारांना सुखावते : पं. सुहास व्यास

पंचामृत संगीत कला प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कलाकारांचा गौरव डॉ. श्याम गुंडावार,...

डॉ. दीपक हरके यांना अमेरिका, बोस्टन येथील ग्लोबल युनिव्हर्सिटीची ॲानररी डॅाक्टरेट

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते सन्मानित पिंपरी, पुणे...