‘उदय गुजर फाउंडेशन’च्या कौशल्य विकास केंद्राचे डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते उद्घाटन

Date:

शिरवळ : ‘उदय गुजर फाउंडेशन’च्या ‘कौशल्य विकास केंद्रा’चे उद्घाटन प्रख्यात वैज्ञानिक आणि पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते नुकतेच झाले.  सातारा जिल्ह्यातील शिरवळमधील विंग या गावी झालेल्या या कार्यक्रमात ‘उदय गुजर फाउंडेशन’चे संचालक उदय गुजर, उर्मिला गुजर, पूरब गुजर, पूर्वा गुजर व व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेडचे अध्यक्ष आर. वासुदेवन उपस्थित होते. प्रख्यात शास्त्रीय गायक महेश काळे, माणदेशी महिला बँकेच्या संस्थापिका व अध्यक्षा चेतना सिन्हा, ज्येष्ठ शिक्षक शंकरराव गाढवे आणि भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसन्न देशमुख हे या प्रसंगी प्रमुख पाहुणे होते. परिसरातील विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थीही यावेळी उपस्थित होते.

हे कौशल्य विकास केंद्र 5 एकर क्षेत्रात पसरलेले आहे. येथे विद्यार्थ्यांना टॅली ईआरपी9 (जीएसटीसहीत), स्पोकन इंग्लिश संज्ञापन, प्रवास पर्यटन, वाहन चालन, तसेच कार्यालयीन सहाय्य आणि करिअर समुपदेशन यांचेे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुलींसाठी येथे वसतिगृहाची सोय असून त्यात 100 मुलींची सोय होऊ शकते. त्या विद्यार्थिनींना या केंद्रात  निवासी प्रशिक्षण दिले जाईल. ‘ना नफाया तत्वावर चालविण्यात येणार्या या कौशल्य विकास केंद्राने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माणदेशी महिला बँकेशी करार केला आहे.

शिक्षणाची गरज आणि महत्त्व यावर आपल्या भाषणात भर देताना डॉ. रघुनाथ माशेलकर या प्रसंगी म्हणाले, “मुलांमध्ये उच्च आकांक्षा असणे आवश्यक आहे. आपण जे काही करीत आहोत, त्यावर आपले पूर्णपणे लक्ष केंद्रित हवे. उत्कृष्टतेची शिडी चढण्यासाठी खरेतर कोणतीही मर्यादा नसते. आपण नेहमी वेगळा विचार करायला हवा. एखाद्या संधीचा दरवाजा उघडला नाही, तर कोणी निराश होऊ नये, उलटपक्षी जीवनात यश मिळवण्यासाठी विविध संधी शोधत राहायला हव्यात.“

उदय गुजर फाउंडेशनचे संस्थापकसंचालक उदय गुजर म्हणाले, “ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण पूर्ण केल्यावर शहरांमध्ये नोकरी मिळणे कठीण असतेे. याचे कारण त्यांच्याकडे मूलभूत संज्ञापन व इतर कौशल्यांचा अभाव असतो. हे लक्षात घेऊन हे केंद्र मुला-मुलींना मूलभूत कौशल्ये देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे, ज्यायोगे मुलांना रोजगार मिळू शकेल आणि त्यांना उत्पन्नाचे साधन मिळेल.”
गुजर पुढे म्हणाले की, अनेक पालक मुलींना पुढील प्रशिक्षण घेण्यासाठी शहरांत पाठविण्यास सुरक्षिततेच्या कारणास्तव टाळाटाळ करीत असतात. त्यांचा हा प्रश्न सोडविण्यासाठी या केंद्रात मुलींसाठी वसतिगृहाची सुविधा उभी करण्यात आली आहे. विंग आणि जवळपासच्या गावांतील अधिकाधिक मुलींना या केंद्राचा फायदा होईल, अशी आशा आहे.

या उपक्रमाला पाठिंबा मदत देणार्या नागरिकांचे संस्थांचे गुजर यांनी आभार मानले.
व्हॅस्कॉन इंजिनियर्स लि.’चे अध्यक्ष आणि उदय गुजर फाउंडेशनचे संचालक वासुदेवन म्हणाले, “या कौशल्य विकास केंद्राच्या पायाभरणीपासूनच त्याचा एक भाग होता आले, याचा मला खूप आनंद आहे. यापुढेही गरजू व विद्यार्थ्यांच्या, विशेषतः मुलींच्या आयुष्यात बदल घडविणार्‍या उपक्रमांना माझे पाठबळ कायम राहील.”

महेश काळे, चेतना सिन्हा, शंकरराव गाढवे, डॉ. प्रसन्न देशमुख, पूरब गुजर आणि पूर्वा गुर्जर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना जीवनात यश मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या दृष्टिकोनाची प्रेरणा दिली. उर्मिला गुजर यांनी सर्वांचे आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....