मुंबई– जेट एअरवेज या भारतातील प्रीमिअर, परिपूर्ण सेवा देणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानकंपनीने प्रवाशांकडून वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2018 पासून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय मार्गांवर 18 अतिरिक्त फ्रिक्वेन्सी सुरू करून, आपले नेटवर्क सक्षम करायचे ठरवले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, जेट एअरवेजने मुंबई आणि यूकेतील मँचेस्टर या दरम्यान देशातील पहिली नॉन-स्टॉप सेवा सुरू केली. 1 डिसेंबरनंतर, कंपनी पुण्याहून नवी, नॉन-स्टॉप सेवा सुरू करून, सिंगापूरशी कनेक्टिविटी अधिक वाढवणार आहे. पुण्याने सिंगापूर येथे सर्वाधिक अराइव्हलची नोंद केली आहे आणि जेट एअरवेजची नवी सेवा मुंबई, दिल्ली व बेंगळुरू या हबद्वारे सिंगापूरला दिल्या जाणाऱ्या सध्याच्या सेवेला पूरक ठरणार आहे. वाढते व्यवसाय व कॉर्पोरेट सेंटर आणि आघाडीचे शैक्षणिक केंद्र असणाऱ्या पुण्यासाठी ही नवी सेवा म्हणजे, विमानकंपनीचे शहरातून दुसरे आंतरराष्ट्रीय ठिकाण असणार आहे.
सिंगापूरमार्गे फार इस्ट, आशिया-पॅसिफिक व ऑस्ट्रेलिया येथे जाणाऱ्या प्रवाशांनाही पुण्यातून सुरू होणारी ही नवी सेवा फायदेशीर ठरणार आहे. या प्रवाशांना, गरूडा इंडोनेशिया, जेटस्टार एशिया व कंटास अशा कंपनीच्या कोडशेअर व इंटरलाइन पार्टनर्सच्या सेवेच्या मदतीने पुढील प्रवास सुरळीत करता येईल. भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी सेवा अतिशय सोयीची ठरेल व वेळेमध्ये मोठी बचत करेल.
डिसेंबरच्या सुरुवातीला, जेट एअरवेजने वाढती मागणी विचारात घेऊन, बँकॉक, काठमांडू व सिंगापूर या आशियायी व दोहा व दुबई या आखाती देशांतील ठिकाणांमध्ये नव्या फेऱ्या समाविष्ट करायचे ठरवले आहे. लवकरच, कंपनी दिल्लीहून बँकॉक व सिंगापूर येथे प्रत्येकी तिसरी दैनंदिन फ्रिक्वेन्सी आणि मुंबईहून सिंगापूरला तिसरी दैनंदिन सेवा सुरू करणार आहे. यामुळे सध्याच्या सेवेमध्ये वाढ होणार आहे. भारत व आशियायी परिसरातील वाढत्या वाहतुकीचा हा थेट परिणाम आहे. सिंगापूर व भारत या दरम्यानची इंडस्ट्री एअर पॅसेंजर वाहतूक 2017 मध्ये 17% वाढली.
आखाती देशांसाठी आणखी फ्रिक्वेन्सी सुरू केल्या जाणार आहेत आणि या प्रदेशासाठी व या प्रदेशाकडून सेवा देणारी एक सर्वात मोठी कंपनी म्हणून विमानकंपनीचे स्थान अधिक बळकट होणार आहे. मुंबई व दिल्ली यांना दोहाशी जोडणारी प्रत्येकी दुसरी सेवा डिसेंबरमध्ये सुरू केली जाणार आहे. मुंबई व दुबई यादरम्यान सातवी दैनंदिन सेवा सुरू केल्याने, बिझनेस व लिजर प्रवाशांसाठी दैनंदिन जास्तीत जास्त विमान सेवा उपलब्ध करून आखातातील लोकप्रिय ठिकाणी 24 तास कनेक्टिविटी देणारी जेट एअरवेज ही एकमेव विमानकंपनी ठरणार आहे.
जेट एअरवेज दिल्ली आणि नेपाळची राजधानी काठमांडू यादरम्यान चौथी दैनंदिन फ्रिक्वेन्सीही सुरू करणार आहे.
किफायतशीर नसणाऱ्या ठिकाणांपेक्षा अधिक उत्पादक व किफायतशीर मार्गांवर सेवा देण्याच्या कंपनीच्या धोरणाचा भाग म्हणून, मुंबई व दिल्ली या केंद्रांमध्ये आपले नेटवर्क बळकट करण्याच्या उद्देशाने, कंपनीने नेटवर्कचा सर्वंकष आढावा घेतल्यावर या अतिरिक्त सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मध्यवर्ती केंद्रांच्या मार्फत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय जाळ्याशी इतकी व्यापक कनेक्टिविटी उपलब्ध केल्यावर विमानकंपनीला आपले कार्य वाढवणे शक्य होईल, प्रवाशांसाठी अधिक पर्याय व कनेक्टिविटी देणाऱ्या अतिरिक्त फ्रिक्वेन्सी सुरू करता येतील. या निर्णयांमुळे, विशिष्ट बाजारातील मागणीच्या अनुषंगाने क्षमता वापरण्यासाठीही मदत होईल.
जेट एअरवेजने या हबमध्ये देशांतर्गत कनेक्टिविटी वाढवण्याचेही ठरवले आहे. त्यानुसार, मुंबई व अमृतसर यांच्यातील सेवा दैनंदिन केली जाणार आहे, तसेच डिसेंबरमध्ये दिल्ली – अमृतसर मार्गावर चौथी दैनंदिन सेवा सुरू केली जाणार आहे. दिल्ली व बेंगळुरू – वडोदरा मार्गांवर नव्या विमानसेवा, मुंबई – गुवाहाटी व मुंबई – पाटणा येथे अधिक फ्रिक्वेन्सी आणि दिल्ली – जोधपूर मार्गावर क्षमतेमध्ये ATR वरून 737 पर्यंत वाढ, अशा हिवाळी वेळापत्रकाच्या सुरुवातीला सुरू करण्यात आलेल्या नव्या सेवांच्या व्यतिरिक्त या सेवा सुरू केल्या जाणार आहेत.
जेट एअरवेजचे जगभरातील विक्री व वितरणाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार यांनी सांगितले, “या धोरणामुळे जेट एअरवेजला दक्षिण व पश्चिम भारतातील बहुतेकशा नेटवर्कशी मुंबईद्वारे अधिक कनेक्टिविटी देता येईल. तसेच, दिल्लीसाठीच्या नव्या सेवेमुळे उत्तर व पूर्व भारताशी सुरळीत कनेक्टिविटी मिळेल. दोन्ही हब आंतरराष्ट्रीय नेटवर्कच्या वाढत्या कनेक्शनसह, देशांतर्गत विस्तृत सेवेचा लाभ घेण्यासाठी पूरक ठरतील. कारण, कंपनीने पूर्व व पश्चिम यादरम्यान आणखी सेवा देण्यासाठी, तसेच आशियातील वाढते प्रादेशिक केंद्र म्हणून प्रगती करण्यासाठी पावले उचलली आहेत.”
नुकत्याच घेण्यात आलेल्या नेटवर्कच्या आढाव्यानुसार जाहीर करण्यात आलेल्या वरील सेवांमुळे विमानकंपनीला उत्पन्न वाढवण्यासाठी, तसेच नव्या, इंधनक्षम B737 MAX ताफ्याचा पूर्णतः लाभ घेण्यासाठी मदत होईल. त्यापैकी आणखी 6 या आर्थिक वर्षात समाविष्ट होण्याची शक्यता आहे. एकत्रित, नव्या एअरक्राफ्टमुळे कंपनीला उत्पन्न वाढवता येईलच, शिवाय खर्चातही कपात करता येईल.