पुणे : ‘नायट्रो बीस्कोप फिटनेस’साठी खरोखर अभिमानाचा क्षण ठरणारी घटना नुकतीच घडली. मुंबईतील हॉटेल ऑर्किडमध्ये नुकत्याच झालेल्या तिसऱ्या ‘ग्रँड एडिशन ऑफ न्युट्रिशन अँड वेलनेस ॲवॉर्ड्स २०१७’ पुरस्कार सोहळ्यात ‘नायट्रो बीस्कोप फिटनेस’चा ‘बेस्ट जिम ऑफ द इयर इन इंडिया’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्याचे संयोजन ‘सीआयएमएस मेडिका’तर्फे करण्यात आले होते. ‘नायट्रो वेलनेस अँड फिटनेस क्लब’चे संस्थापक प्रबोध डावखरे यांच्या वतीने हा प्रतिष्ठित पुरस्कार ‘नायट्रो’च्या संचालक सोनिया डावखरे यांनी ‘सीआयएमएस मेडिका’च्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. मोनिका भाटिया यांच्या हस्ते स्वीकारला. एकंदर दर्जा, ग्राहक सेवा व सुविधा या निकषांवर आधारित काटेकोर सर्वेक्षणानंतर ‘नायट्रो’ची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. याआधीही ‘नायट्रो’ला विविध सन्मानांनी गौरवण्यात आले आहे. लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया येथील ‘डेस्टिनेशन लक्झरी’ने जगातील सर्वोत्तम दहा जिममध्ये ‘नायट्रो’चा समावेश केला आहे.
‘नायट्रो फिटनेस’ ही प्रबोध डावखरे यांनी स्थापन केलेल्या फिटनेस हब्जची साखळी आहे. त्यांनी वर्ष २०१२ मध्ये स्वास्थ्यदायी प्रशिक्षण देण्याच्या एकमेव हेतूने ‘नायट्रो फिटनेस’ उघडले. आज या साखळीची ठाण्यात दोन केंद्रे, ब्रिच कँडी येथे एक केंद्र व चौथे पुण्यात कल्याणीनगर येथे यशस्वी कार्यरत आहेत.
‘नायट्रो’ हे मौजेच्या वातावरणात तंदुरुस्ती गांभीर्याने घडवणारे फिटनेस हब आहे. तेथील सर्व उपकरणे ही ग्राहकांच्या गरजेनुरुप तयार करुन घेण्यात आली असून जगातील सर्वोत्तम उत्पादकांकडून आयात करण्यात आली आहेत. विविध स्रोतांतून सर्वोत्तम ते घेण्यामुळे जिम स्थापन करताना कुठेही दर्जाशी तडजोड करण्यात आली नसल्याचे दिसून येते.
यासंदर्भात प्रबोध म्हणतात, “आम्ही आमच्या उपकरणांपासून सेवांपर्यंत प्रत्येक बाबतीत वेगळेपण जपले आहे. आमच्या दृष्टीने ग्राहकांना अनोखा ‘नायट्रो’ अनुभव मिळणे महत्त्वाचे आहे. तंदुरुस्ती उद्योगात क्रांती घडवण्यासाठी व एक जिम कसे असले पाहिजे या दृष्टीकोनातून आम्ही काम करत आहोत.”
तंदुरुस्ती उद्योगाच्या विविध क्षेत्रांतील स्पृहणीय कामगिरी करणाऱ्यांना या सोहळ्यात गौरवण्यात आले. त्यामध्ये जीएसके, नेस्ले, ॲबट आदी कंपन्यांचाही समावेश होता.