जगभरातील विजेत्यांना मिळणार १००,००० डॉलर्सचे बक्षीस
पुणे-उद्योजकतेला अधिक चालना देण्याप्रती असलेल्या आपल्या मिशनला अधिक पुढे घेऊन जात टीआयईने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय योजना स्पर्धा – बिझ क्वोशिएण्ट हा उपक्रम सुरू केला आहे. पुण्याच्या टीआयईचे अध्यक्ष विनीत पाटनी म्हणाले, ”आमचा विश्वास आहे की, तरूणांना योग्यरित्या मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थी आपल्या देशाची सर्वोत्तम संपत्ती आहेत आणि नवीन व्यवसाय निर्मितीसाठी त्यांची क्षमता व सर्जनशीलतेचा उपयोग करत संपत्ती, रोजगार निर्माण करण्यास मदत करण्यामध्ये वावगे काय आहे?”
पुणे शहरामध्ये, तसेच आसपासच्या परिसरामध्ये कोणत्याही महाविद्यालयात कोणत्याही शाखेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहेत. या उपक्रमाचे प्रमुख अद्वैत कुर्लेकर म्हणाले, ”आम्ही उपक्रम महाविद्यालयांच्या माजी विद्यार्थ्यांसाठी देखील विस्तारित केला आहे. पण २०१९ नंतर उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांसाठीच हा उपक्रम आहे. आमच्या वेबसाइटवर नोंदणी करण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी २०२२ आहे.”
जवळपास १० युनिव्हर्सिटीज व महाविद्यालयांनी टीआयई, पुणे सोबत सहयोग केला आहे आणि नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी या युनिव्हसिर्टीज व महाविद्यालयांमध्ये आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. अद्वैत म्हणाले, ”आंतर महाविद्यालयीन स्पर्धेनंतर टीआयई पुणे चॅप्टर स्तरावर इंटर कॉलेज स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. या इंटर कॉलेज लेव्हल स्पर्धेचा विजेता जागतिक स्पर्धेमध्ये टीआयई पुणेचा प्रवेशक म्हणून पात्र ठरेल. विजेत्यांना सिलिकॉन व्हॅली येथे पाठवण्यात येईल, जेथे ते जगभरातील इतर टीआयई चॅप्टर्समधील विजेत्यांसोबत स्पर्धा करतील.”
पुण्यामधील विजेत्यांना १,००,००० रूपयांचे रोख बक्षीस मिळेल आणि जगभरातील विजेत्यांना १००,००० डॉलर्सचे बक्षीस मिळेल. याव्यतिरिक्त सिलिकॉन व्हॅलीसाठी पात्र सर्व विद्यार्थी बूट कॅम्प्समध्ये सहभाग घेतील, जागतिक गुरूंकडून मार्गदर्शन मिळवतील आणि त्यांच्या नेटवर्क्सचा विस्तार करतील.
तसेच टीआयई पुणे विविध महाविद्यालयांमधील पहिल्या तीन विजेत्यांना सवलतीची असोसिएट मेम्बरशीप ऑफर करेल आणि सर्व उमेदवार टीआयईमधील उद्योजकता कौशल्याचा लाभ घेऊ शकतात. अद्वैत म्हणाले, ”आमचा या विद्यार्थी स्टार्ट-अप्सचा शोध घेऊन त्यांची प्रगती करण्याचा आणि त्यांना युनिकॉर्न्स बनताना पाहण्याचा मनसुबा आहे.”