Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांच्या हस्ते पुण्यामध्ये येत्या ३० सप्टेंबरला दातार कुलसंमेलनाचे उद्घाटन

Date:

पुणे- जागतिक कीर्तीचे उद्योगपती आणि दुबईस्थित ‘अल अदील’ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार येत्या ३० सप्टेंबरला (रविवार) पुण्यात येत आहेत. कर्वेनगरमधील प्रतिज्ञा हॉलमध्ये होणाऱ्या ‘अखिल दातार कुलसंमेलन २०१८’ या मेळाव्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते सकाळी साडेदहाला होणार आहे. या कार्यक्रमात डॉ. दातार यांची प्रकट मुलाखत होणार असून ती प्रसिद्ध निवेदिका व कुलसंमेलनाच्या सूत्रसंचालक मीनल दातार घेणार आहेत. जीवनाच्या संघर्षपूर्ण प्रवासातून अनेक अडथळे पार करत व्यवसायात गरूडभरारी घेणारे आणि मराठी उद्योजकतेचा झेंडा जागतिक पातळीवर फडकावणारे डॉ. दातार या मुलाखतीतून नवउद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत.

‘अखिल दातार कुलसंमेलन २०१८’ हा उपक्रम म्हणजे दातार हे कुलनाम असणाऱ्यांचे, तसेच मूळचे दातार परंतु कालौघात आघरकर, आगरकर, फडणीस, वर्तक, सबनीस, कुलकर्णी, दफ्तरवार व चौकर ही उपनामे लावणाऱ्यांचे स्नेह संमेलन आहे. त्याच्या आयोजनामागील संकल्पना स्पष्ट करताना या कुलसंमेलनाचे अध्यक्ष मुकूंद कुलकर्णी म्हणाले, “दातार कुलनाम असणाऱ्या व्यक्तींची माहिती असलेला दातार कुलवृत्तांत सन १९७४ मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर गेली ४४ वर्षे तो अद्ययावत झाला नाही आणि दातार कुलनामाचा मेळावाही व्यापक पातळीवर झाला नाही. दातार घराण्याच्या पुढील पिढ्यांना ही माहिती मिळून ते एकत्र यावेत, दातार कुलवृत्तांत अद्ययावत व्हावा व दातार आडनाव भूषविणाऱ्या कर्तबगार व्यक्तींचा सन्मान व्हावा, या तिहेरी हेतूने आम्ही हा उपक्रम आखला असून त्याची सुरवात पुण्यापासून होत आहे. महाराष्ट्रभर, तसेच इतर राज्यांत स्थाईक झालेले दातार या मेळाव्यासाठी येणार असून सुमारे ४०० लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. मेळाव्यात ज्येष्ठ व्हायोलिन वादक पद्मश्री डी. के. दातार, मसालाकिंग डॉ. धनंजय दातार, जागतिक कीर्तीचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखील दातार, शस्रास्र रचना तज्ज्ञ तसेच आर्मामेंट्स विभागाचे माजी सरसंचालक अनिल दातार, महाराष्ट्र भूषण अरुण दातार, गीता धर्म प्रसारक डॉ. मुकूंद दातार, गायिका प्रमिला दातार आदी दहा नामवंत दातार व्यक्तींचा सत्कार केला जाईल. दातार कुलनाम भूषवणाऱ्या व्यक्तींची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे उद्घाटनही यावेळी होईल.”

“या प्रतिष्ठित मेळाव्यात सहभागी होण्याची संधी मिळणे, हे माझ्यासाठी आनंददायक असून दातार कुलनामाच्या अनेक ख्यातनाम व्यक्तींपैकी एक असणे गौरवास्पद आहे”, अशी प्रतिक्रिया डॉ. धनंजय दातार यांनी व्यक्त केली आहे.

 

डॉ. धनंजय दातार यांच्याविषयी :

जिद्द, अफाट मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्रात अनेक उद्योजक घडले आहेत. यातील काही मोजक्या उद्योजकांनी भारतातच नव्हे, तर जगातही आपल्या उद्योगाचे साम्राज्य निर्माण केले आहे. दुबईतील सुप्रसिद्ध ‘अल अदील’ समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या डॉ. दातार यांनी गेल्या ३३ वर्षांत आपल्या व्यवसायाचा आखाती देशांत प्रचंड जम बसवला. दुबईमध्ये एका छोट्याशा दुकानापासून व्यवसायास सुरुवात करणाऱ्या दातार यांनी आखाती देशांत ४० सुपर मार्केट्सची स्वत:ची रीटेल आऊटलेट्सची साखळी निर्माण केली. त्याचबरोबर पिठाच्या दोन गिरण्या आणि  मसाल्याचे दोन कारखानेही उभारले. धनंजय दातार यांची ‘अल अदिल ट्रेडिंग’ कंपनी आखाती देशांतील स्थानिक व भारतीयांच्या घराघरांत पोचली आहे.

डॉ. धनंजय दातार यांची यशोगाथा उद्योगाची आकांक्षा बाळगणाऱ्या तरुणांसाठी, तसेच नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. गरीबीत बालपण गेलेल्या धनंजय यांनी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्षाचा मुकाबला केला आहे. कोणताही उद्योजकीय वारसा अथवा आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी तरुण वयात व्यवसायाचे स्वप्न बघितले. मुंबईत फिनेल विक्रीचा व्यवसाय करताना विक्रीकला व ग्राहकसेवा कौशल्य आत्मसात केले. वडिलांनी दुबईत सुरु केलेल्या छोट्याशा दुकानात झाडू-पोछा, लादी सफाई, पोती वाहून नेणे अशा कामांतून कारकीर्दीची सुरवात केली. आई-वडिलांच्या संस्काराची शिदोरी आणि कष्टाळू वृत्ती या जोरावर त्यांनी एका छोट्याशा व्यवसायाचे रुपांतर बहुराष्ट्रीय उद्योग समूहात करुन दाखवले. दुबईच्या शासकांनी धनंजय दातार यांना ‘मसालाकिंग’ बहुमानाने संबोधून त्यांच्या परिश्रम आणि कर्तृत्वाचा यथोचित गौरव केला आहे.

व्यवसाय लहान आहे, की मोठा, असा विचार न करता वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा आणि परिणामकारक सेवा या त्रिसूत्रीच्या जोरावर ग्राहकांचे समाधान केल्यास नक्कीच यश मिळते,यावर डॉ. दातारांचा भर आहे. प्रचंड मेहनत आणि प्रामाणिकपणा याशिवाय स्वप्ने पूर्ण होत नाहीत, असा सल्ला ते नेहमीच तरुणांना देतात. हाच प्रामाणिकपणा दातार यांनी मागील ३३वर्षे आपल्या व्यवसायात कायम ठेवला. यामुळे त्यांना भारताबरोबरच जागतिक स्तरावरहीअनेक प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.‘फोर्ब्स मिडल ईस्ट’तर्फे नुकताच ‘टॉप इंडियन लीडर्स इन द अरब वर्ल्ड २०१८ – रीटेल ॲवॉर्ड’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. डॉ. दातार हे ‘फोर्ब्स मिडल ईस्ट’च्या आघाडीच्या १०० भारतीय नेत्यांच्या मानांकन यादीतील बहुधा एकमेव महाराष्ट्रीय आहेत. अरेबियन बिझनेस रँकमध्ये त्यांना १४ वे, तर फोर्ब्जच्या यादीमध्ये ३० वे मानांकन मिळाले आहे.

डॉ. दातार यांनी विविध संस्थांना मदत करुन सामाजिक बांधीलकीही जपली आहे. भारतीय संस्कृतीचे आखाती देशांमध्ये संवर्धन करण्यात ते आघाडीवर आहेत. दुबईमध्ये मराठी उपक्रम राबवण्यास ते अधिकाधिक मदत करतात. ‘अल अदील ट्रेडिंग’ समूहाने डॉ. धनंजय दातार यांच्या चैतन्यशील नेतृत्वाखाली ९००० भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत (युएई) आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून स्वतःच्या ‘पिकॉक’ या ब्रँडअंतर्गत तयार पिठे, मसाले, लोणची, मुरंबे, नमकीन, इन्स्टंट अशा श्रेणींत ७०० हून अधिक उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहेत. मसाले व पिठे तयार करुन पॅकबंद करण्यासाठी डॉ. दातार यांनी दुबई इन्व्हेस्टमेंट पार्कमध्ये दीड लाख चौरस फुटांचा भव्य प्रकल्प उभारला आहे. त्यांच्या उद्योगाची भारतीय शाखा ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स’ या नावाने मुंबईत कार्यरत आहे.‘अल अदील’ समूहाचे ४० आऊटलेट्स, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त २ पिठाच्या गिरण्या व २ मसाला कारखाने असे जाळे दुबई, अबू धाबी, शारजा व अजमान येथे विस्तारले असून मुंबई निर्यात विभागाची शाखा ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ नावाने मुंबईत आहे. ‘अल अदील’ समूह सक्रिय विस्ताराच्या टप्प्यात असून त्याने नुकतीच दुबईसह ओमान, बहारीन व सौदी अरेबियामध्ये नवी आऊटलेट्स उघडली आहेत. कंपनीने अमेरिका,कॅनडा, टांझानिया, केनया, स्वित्झर्लंड, इटली व एरित्रिया, तसेच कुवेत, ओमान व संयुक्त अरब अमिरातीत विशेष व्यापारी मार्ग स्थापन करुन आयात व निर्यात क्षेत्रातही विस्तार साधला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...