पुणे-काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुमन उर्फ लताताई पवार यांचे दुःखद निधन झाले. त्या 70 वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या मागे 2 विवाहित मुले, 1 विवाहित मुलगी ,नातवंडे असा परिवार आहे.
पर्वती काँग्रेस ब्लॉकचे अध्यक्ष सतीश पवार यांच्या त्या मातोश्री होत. आयुष्यभर त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला अनुसरून काम केले समाजाच्या तळागाळापर्यंत त्यांचा संपर्क असायचा. आलेल्या प्रत्येक माणसाची अत्यंत मनमिळावू पद्धतीने संवाद साधायचे, त्याची विचारपूस करायच्या. प्रत्येक कामात त्या रुची ठेवायच्या. चव्हाण नगर, पद्मावती भागांमध्ये शोक व्यक्त होत आहे.आबा बागुल,सुभाष जगताप,नितिन कदम,महेश वाबळे, अभय छाजेड़, शैलेंद्र नलावडे, अनिल सातपुते, हनुमंत साठे आदी मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.