पुणे विभागातील 17 लाख 14 हजार 371 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 17 लाख 96 हजार 274 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 18 : पुणे विभागातील 17 लाख 14 हजार 371 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 17 लाख 96 हजार 274 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 44 हजार 770 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 37 हजार 133 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.07 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.44 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 70 हजार 285 रुग्णांपैकी 10 लाख 42 हजार 43 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 176 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 66 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.36 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 7 हजार 770 रुग्णांपैकी 1 लाख 94 हजार 222 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 534 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 70 हजार 146 रुग्णांपैकी 1 लाख 62 हजार 843 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 827 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 476 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 63 हजार 536 रुग्णांपैकी 1 लाख 48 हजार 653 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 507 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 376 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 84 हजार 537 रुग्णांपैकी 1 लाख 66 हजार 610 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 726आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 201 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्णसंख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 4 हजार 593 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 77, सातारा जिल्ह्यात 876, सोलापूर जिल्ह्यात 601, सांगली जिल्ह्यात 1 हजार 99 तर कोल्हापूर जिल्ह्यात 938 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 4 हजार 187 आहे. पुणे जिल्हयामध्ये 943, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 181, सोलापूर जिल्हयामध्ये 371, सांगली जिल्हयामध्ये 756 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 936 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 19 लाख 27 हजार 534 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 17 लाख 96 हजार 274 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप : दि. 17 जुलै 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)