पुणे विभागातील 16 लाख 490 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 16 लाख 71 हजार 281 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 23 : पुणे विभागातील 16 लाख 490 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 16 लाख 71 हजार 281 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 36 हजार 31 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 34 हजार 760 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.08 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.76 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 41 हजार 865 रुग्णांपैकी 10 लाख 15 हजार 938 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8 हजार 391 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 536 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.51 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 87 हजार 58 रुग्णांपैकी 1 लाख 74 हजार 462 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 134 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 462 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 60 हजार 821 रुग्णांपैकी 1 लाख 54 हजार 299 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 176 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 346 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 37 हजार 888 रुग्णांपैकी 1 लाख 25 हजार 540 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 417 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 931 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 43 हजार 649 रुग्णांपैकी 1 लाख 30 हजार 251 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 913 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 485 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 4 हजार 345 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 115, सातारा जिल्ह्यात 722, सोलापूर जिल्ह्यात 330, सांगली जिल्ह्यात 929 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 249 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 5 हजार 483 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 612, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 92, सोलापूर जिल्हयामध्ये 314, सांगली जिल्हयामध्ये 929 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 249 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरणाचे प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 33 लाख 11 हजार 969, सातारा जिल्ह्यामध्ये 8 लाख 35 हजार 354, सोलापूर जिल्हयामध्ये 6 लाख 83 हजार 446 , सांगली जिल्हयामध्ये 7 लाख 72 हजार 557 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 12 लाख 44 हजार 763 नागरिकांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 87 हजार 458 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 16 लाख 71 हजार 281 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 22 जून 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)