पुणे विभागातील 19 लाख 21 हजार 651 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 19 लाख 78 हजार 359 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 19 : पुणे विभागातील 19 लाख 21 हजार 651 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 78 हजार 359 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 891 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 40 हजार 817 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.13 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 30 हजार 909 रुग्णांपैकी 11 लाख 4 हजार 671 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 7 हजार 504 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 734 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.68 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 46 हजार 27 रुग्णांपैकी 2 लाख 35 हजार 73 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 749 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 205 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 98 हजार 900 रुग्णांपैकी 1 लाख 92 हजार 240 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 734 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 926 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 96 हजार 863 रुग्णांपैकी 1 लाख 90 हजार 464 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्य 1 हजार 196 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 203 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 5 हजार 660 रुग्णांपैकी 1 लाख 99 हजार 203 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 708 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 749 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 488 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 731, सातारा जिल्ह्यात 315, सोलापूर जिल्ह्यात 209, सांगली जिल्ह्यात 172 तर कोल्हापूर जिल्ह्यात 61 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 830 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1012, सातारा जिल्हयामध्ये 125, सोलापूर जिल्हयामध्ये 403, सांगली जिल्हयामध्ये 190 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 100 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 64 लाख 11 हजार 686 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 19 लाख 75 हजार 337 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 18 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)