व्यंगचित्रकारांची मुस्कटदाबी सहन करणार नाही; शिवसेना आणि व्यंगचित्रकार रस्त्यावर!

Date:

कार्टूनिस्ट्स कंबाइनचे इन्स्टाग्राम पेज बंद केल्याने संताप; अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचे गौरव सर्जेराव यांचे आवाहन

पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रकारांसाठी स्थापन केलेल्या ‘कार्टूनिस्ट्स कंबाइन’ संस्थेचे इन्स्टाग्राम पेज तसेच काही व्यंगचित्रकारांची सोशल मीडिया खाती बंद करण्यात आल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि व्यंगचित्रकारांनी एकत्र येत आंदोलन केले. शनिवारी पुण्यातील गुडलक चौकातील कलाकार कट्ट्यावर झालेल्या या आंदोलनात ‘मेटा’च्या कारवाईचा तीव्र निषेध करण्यात आला.व्यंगचित्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा कार्टूनिस्ट्स कंबाइनचे अध्यक्ष तथा व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांनी दिला.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी एकत्र या!

भारतीय संविधानाने नागरिकांना बहाल केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचा आरोप गौरव सर्जेराव यांनी केला. विरोधकांना व्यक्त होण्याची संधी मिळू नये, यासाठी ‘मेटा’कडून थेट कारवाई केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

संविधानाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येत लढा उभारण्याची गरज आहे. व्यंगचित्रकारांची मुस्कटदाबी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असे सर्जेराव यांनी ठणकावून सांगितले.

व्यंगचित्रकारांच्या हक्कांसाठी शिवसेना आक्रमक

व्यंगचित्रकारांच्या सोशल मीडिया खात्यांवरील कारवाईविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुणे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. व्यंगचित्रकारांच्या आंदोलनाला पाठिंबा देत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी एकजूट दर्शविली.

व्यंगचित्रकारांची मोठी उपस्थिती

या आंदोलनात कार्टूनिस्ट्स कंबाइनच्या वतीने गौरव सर्जेराव, अमित पापळ, धनराज गरड, उदय मोहिते, रोहित कबाडे, नीरज सबनीस, ओमकार बागवे, विशाल कुयटे, प्रभाकर दिघेवार, मुकीम तांबोळी, निखिल विल्हेकर, मंदार पर्डीकर आणि जयेश दळवी उपस्थित होते.

शिवसेनेच्या वतीने पुणे शहरप्रमुख वसंत मोरे, सहसंपर्कप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख भरत कुंभरकर, पंढरीनाथ खोपडे, प्रशांत राणे, संघटक राजेंद्र शिंदे, संतोष गोपाळ, किशोर राजपूत, कार्यालयीन सचिव मकरंद पेठकर, प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत, विभागप्रमुख अतुल दिघे, उत्तम भुजबळ, चंदन साळुंके, शिवाजी मते, संदीप गायकवाड, राजेश मोरे, परेश खांडके, सोहम जाधव, चिंतामण मुंगी, जुबेर तांबोळी, संतोष भुतकर, सुरज मोराळे, बकुळ डाखवे, नितीन निगडे, सोमनाथ कोकणे, रमेश परदेशी, सचिन चिंचवडे, गिरीश गायकवाड, अमर काची, दिलीप पोमान, दीपक जगताप, बद्ददिन शेख, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख दत्ता घुले, राहुल शेडगे, नागेश खडके, राहुल बायस, संतोष होडे, दीपक कुंजीर, किरण कांबळे, सचिन घोलप, हेमंत जोशी, आदित्य काटे, शिवाजी मेलकरी, विश्वनाथ मोरे, अजित बांदल, जुबेर शेख, सूर्यकांत पवार, मनीष जाधव, हर्षद ठकार, नितीन दलभंजन, अभिषेख जगताप, अमेय डोहिफोडे, नितीन जगताप, अमित राऊत, मंगेश रासकर, जयंत गिरी, मेजर खोमणे, नीरज नांगरे, सुहास आढाव, अथर्व लांडगे, आशिष मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महिला आघाडीच्या पद्मा सोरटे, विद्या होडे, विजया मोहिते, अमृता पठारे, सविता गोसावी, सोनाली जुनवणे, करुणा घाडगे, रोहिणी कोल्हाळ, अयोध्या डोहिफोडे आणि संगीता भिलारे यांचीही उपस्थिती होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आता एनडीएमध्ये जाण्याची धडपड, मग अजितदादांना त्रास का दिला? अमोल मिटकरींचा शरद पवार गटाला सवाल

‘यांच्या राजकारणामुळे सोन्यासारखा माणूस गमावला’; रोहित पवार पक्षात एकटे...

निवडणुकीचा नकाशा बदलून,८५० हा आकडा भारतीय लोकशाही नष्ट करेल!’

निवडणुकीचा नकाशा बदलून राजकीय फायदा मिळविण्याचा भाजपचा डाव असल्याचा...

मसापमध्ये सत्तासंघर्ष; योगेश सोमण यांच्याविरोधात २० विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास ठराव मंजूर केल्याची घोषणा!

सुनील महाजन यांची अध्यक्षपदी निवड; शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी...

महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईचा आजचा आकडा साडेतीन लाख चौरस फुटांपार!

डीपी रोडवरील सर्वाधिक २ लाख ३९ हजार चौरस फुटांवरील...