तुष्टीकरणाचे खेळ हा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा अजेंडा
मुंबई –मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या एका क्रीडा मैदानाचे ‘वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल’ असे नामकरण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार करत आहे. स्थानिक आमदार आणि काँग्रेसचे नेते तथा मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून हे सर्व काम पूर्णत्वास आले आहे.मालाड-मालवणी येथील या क्रीडा मैदानाचे ‘वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल’ असे नामकरण करण्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्याकरीता मुंबई भाजपा तर्फे आंदोलन करण्यात येत आहे.
मुंबईसह राज्यभरात काही विशिष्ट समाज घटकांचे तुष्टीकरण करण्याचे प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून केले जात आहेत. मालाड-मालवणी भागात मागील अनेक वर्षांपासून स्थानिक हिंदूंना त्या भागातून हद्दपार करण्याचे डाव आखले जात जोत आहे. आता क्रीडासंकुलनाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा घाट महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पार्टी घालण्याचा प्रयत्न करत आहे. यांचा निषेध व्यक्त करण्याकरिता मुंबई भाजप कडून आंदोलन करण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारचे मनसुबे आम्ही कदापि पूर्ण होऊ देणार नाही असे मुंबई भाजपाने म्हटले आहे.