ओएनजीसी प्लान्टमधील एकापाठोपाठ तीन स्फोटांनी सूरत हादरले

Date:

गुजरातमधील सूरतमधील तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन (ONGC) च्या प्लांटमध्ये बुधवारी रात्री उशीरा आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. मिळालेल्या वृत्तानुसार या स्थळी एकापाठोपाठ एक तीन भीषण स्फोट झाले. या स्फोटानंतर आगीचे मोठेमोठे लोळ आकाशात उठले.

हे स्फोट एवढे भीषण होते की, याचा हादरा 3-4 किलोमीटरपर्यंत बसला. सुदैवाने सुरतच्या ONGC हजारिया प्लान्टमध्ये लागलेल्या आगीत सुदैवानेजीवितहानी झालेली नाही. मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आता यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास तीन वाजता ओएनजीसी हजीरा प्लांटमध्ये सलग तीन स्फोट झाले. या स्फोटाचा आवाज अनेक किलीमीटर दूर ऐकू गेला. या घटनेने संपूर्ण सूरत हादरले. अनेक लोक स्फोटाचा आवाज एकूण घराबाहेर आले. आकाशातील आगीचे लोळ पाहून सर्वच घाबरले. यानंतर अग्निशमन दलाने दाखल होत आग विझवली. जवळपास चार तासांच्या परिश्रमांनंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खडकवासल्यातून मुठा नदीत पाणी सोडले..

खडकवासला धरणातून मध्यरात्री १ वाजल्यापासून मुठा नदीत १,६८४ क्युसेक...

रस्त्यांचे झाले नाले..केंद्रीय मंत्री मोहोळ अधिकाऱ्यांना म्हणाले,आजवर तुम्ही काय केले.. ?

आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा घेतला आढावा पुणे (प्रतिनिधी) केंद्र सरकार आणि...

पन्नास वर्षांच्या संघर्षाला न्याय; महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक ऐतिहासिक – डॉ. नीलम गोऱ्हे”

"शेतकरी महिलांच्या श्रमांना अखेर कायदेशीर मान्यता; सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचे...