मिळकतकर 50 टक्के कमी करा : उज्ज्वल केसकर

Date:

पुणे-सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MMC Act कलम 133 A मध्ये दिलेल्या अधिकाराचा वापर करून पुणेकर, व्यावसायिक दुकानदार आणि इतर लोकांचा मिळकत कर 50 टक्के कमी करावा, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक सुहास कुलकर्णी यांनी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्याकडे बुधवारी केली.

अशा प्रकारे निर्णय घेणारी पुणे मनपा ही पहिली मनपा असेल. यात कमी होणारे नुकसान राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांकडून 25 टक्के प्रत्येकी मिळवून घेता येईल. पुणेकरांनी आपल्या पक्षावर विश्वास दर्शविला आहे. खासदार, आमदार, नगरसेवक म्हणून निवडून दिले आहेत. त्यांना दिलासा दिला पाहिजे. याकामी राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार्य मिळू शकते, कारण त्यांचेही नगरसेवक मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी निवडून दिले आहेत.

तसेच, दोन आमदारही निवडून आले आहेत. या प्रस्तावित योजनेचा विचार करून पुणेकरांना दिलासा द्यावा, असेही उज्ज्वल केसकर आणि सुहास कुलकर्णी यांनी म्हटले आहे. एका असाधारण परिस्थितीतून आज देश मार्गक्रमण करीत आहे. कोरोनाच्या महामारीने सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड आर्थिक विवंचना भासते आहे.

नरेंद्र मोदी सरकारने मोठे आर्थिक पॅकेज दिले आहे. महाराष्ट्र शासनाने अद्याप पॅकेज दिले नाही. स्थायी समिती अध्यक्ष आपण मालमत्ता कर वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहात, त्यादृष्टीने काही निर्णय घेण्यात आले आहेत. स्तुत्य उपक्रम आहे, असेही त्यांनी सांगितले. महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, खासदार, सर्व आमदार पुणे, प्रधान सचिव नगरविकास ,मनपा आयुक्त यांना या निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नदीत सुधार प्रकल्पातील त्रुटींमुळेच पूरस्थिती; जबाबदारांवर कारवाई करा : डॉ. सिद्धार्थ धेंडे

पुण्यातील प्रभाग क्रमांक दोनसह अनेक वस्त्यांमध्ये पाणी* धरणांतून पाणी न...

🟥 सोमवार पेठेतील जीर्ण दुमजली वाडा कोसळला

🟨 रहिवाशांना आधीच सुरक्षित बाहेर काढल्याने जीवितहानी टळली; धोकादायक...

संकटसमयी धावून आले ‘पीएमआरडीए’चे देवदूत! मुसळधार पावसात युद्धपातळीवर बचावकार्य; शेकडो नागरिकांचे वाचवले प्राण!

मावळ, लोणावळा परिसरात दरड कोसळल्याच्या दुर्घटनांनंतर 'पीएमआरडीए'च्या 'पीडीआरएफ'कडून तात्काळ...

महापालिकेकडून ७५ कुटुंबांतील ३०० नागरिकांना निवारा

पुणे, दि. ६ :पुणे शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर...