नवी दिल्ली- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नुकतीच काही वेळेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यावेळी मोदी यांनी मोठ्या उत्साहाने शिंदे आणि फडणवीस यांचे स्वागत केले आणि कौतुकही केले. यावेळी महाराष्ट्रातील राजकीय स्थिती आणि परिस्थिती ची मोदी यांनी माहिती घेतली.
या भेटीत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना देखील विठोबा – रखुमाईची मूर्ती भेट म्हणून दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी रात्री केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची 6 ए, कृष्ण मेनन मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. आज सकाळी त्यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची 17 अकबर रोड या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची 7 ,लोक कल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.