एक्झिट प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मांडले पुण्याचे स्वरुप बदलणारे वास्तुशास्त्र प्रकल्प

Date:

डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज (पीव्हीपी) आॅफ आर्किटेक्चरतर्फे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे सभागृह येथे एक्झिट एक्झिबिशनचे आयोजन : विनामूल्य प्रवेश 
पुणे : पुण्यातील मुळा मुठा नदी काठावरील अत्याधुनिक सांस्कृतिक केंद्र… पूर्वी शुद्ध पाण्याचा प्रवाह असलेला आणि आता नाल्याचे स्वरुप झालेल्या आंबील ओढ्याच्या बाजूने करता येतील असे नागरिकांसाठी उपयुक्त प्रकल्प…भिडे पुलाशेजारील सर्कस, जत्रा समाविष्ट करणारा आणि पाणी पातळी वाढल्यास स्थलांतरीत करता येणारा अर्बन मेला प्रकल्प असे पुण्याचे स्वरुप बदलणारे आणि सर्वोत्तम राहणीमान मिळवून देणारे विविध प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. आधुनिक तंत्रज्ञान आणि कल्पकता वापरुन तयार केलेले विविध वास्तुकला प्रकल्प एक्झिट  २०२२ या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.
विवेकानंद इन्स्टीट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी संस्थेमार्फत संचलित पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज (पीव्हीपी) आॅफ आर्किटेक्चरतर्फे एक्झिट एक्झिबिशन २०२२  या  वास्तूकला प्रदर्शनाचे आयोजन लोकशाहिर अण्णाभाऊ साठे सभागृह येथे करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील, व्हीके आर्किटेक्चरचे संस्थापक विश्वास कुलकर्णी, व्हीआयटीचे अध्यक्ष अॅड.अभय छाजेड, उपाध्यक्ष इंदर छाजेड, मार्गदर्शक विकास भंडारी, व्हीआयटीचे सचिव जितेंद्र पितळिया, प्रबंध मार्गदर्शक विजया श्रीनिवासन, आशिष श्रीवास्तव उपस्थित होते. 

ताजमहाल कारागिरांचे ताजगंज पुनर्विकास प्रकल्प… पुण्यातील डिजिटल मीडिया हब आणि डेटा सेंटर…किशोर सुधार केंद्र…. नाशिकमधील द्राक्ष शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक संशोधन आणि माहिती केंद्र…आदिवासी भागातील मेडिकल सेंटर…पारंपरिक पद्धतीने बांधलेले सांस्कृतिक कला केंद्र…संत कबीरांची जीवनशैली शिकविणारे शिक्षण केंद्र…दिल्ली, राजस्थान, आसाम, नागालॅंड अशा देशातील विविध ठिकाणच्या ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास करीत अतिशय उत्कृष्टपणे प्रतिकृती विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत. दिनांक १० जुलै पर्यत पदर्शन विनामूल्य पाहण्यास खुले आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लॉरिट्झ क्नुडसेन कडून अत्‍याधुनिक तंत्रज्ञान श्रेणी सादर

; भारतातील ऊर्जा क्षेत्रामधील नवीन अध्यायाला गती मिळणार ऊर्जा क्षेत्रात लवचिकता आणि सक्षम यंत्रणेची तातडीची गरज लक्षात घेऊन कंपनीने विविध महत्त्वाच्या उद्योगांसाठी १० हून अधिक अत्याधुनिक ऊर्जा व्यवस्थापन आणि ऑटोमेशन सोल्यूशन्स सादर केले आहेत १००० हून अधिक ग्राहक, भागीदार, सल्लागार आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांसाठी लाइव्‍ह प्रात्यक्षिके आणि टेक्निकल सत्रांचे आयोजन. लो-व्होल्टेज स्विचगियर, ऊर्जा व्यवस्थापन सोल्यूशन्स, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि स्मार्ट होम सोल्यूशन्ससह ३०० हून अधिक उत्पादने आणि नाविन्‍यतांचे प्रदर्शन. भारताची औद्योगिक आणि ऊर्जा संक्रमणाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मेड-इन-इंडिया व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक तंत्रज्ञान देण्‍याप्रती लॉरिट्झ क्नुडसेनची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. मुंबई, मे ७, २०२६: लॉरिट्झ क्नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन या भारतातील इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने आज आपल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पोर्टफोलिओ प्रदर्शनाचा भाग म्हणून १० हून अधिक नेक्‍स्‍ट-जनरेशन इनोव्‍हेशन्‍सच्‍या लाँचची घोषणा केली. यासह...

पुरस्कारावर समाधानी राहू नका : राजीव तांबे

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा पुरस्कार प्रदान सोहळा पुणे : तुमच्या...