देहूतील इंद्रायणी घाटाचा चेहरामोहरा बदलणार; आषाढी वारीसाठी ‘पीएमआरडीए’ची युद्धपातळीवर तयारी!

Date:

महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडून कामाची प्रत्यक्ष पाहणी; वारकऱ्यांच्या सोयीसाठी १३.०८ कोटींचा विकासनिधी!

देहू/पुणे : आगामी आषाढी एकादशी वारीसाठी देहूमध्ये विठ्ठलनामाच्या गजरात येणाऱ्या लाखो भाविकांच्या आणि वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) पूर्णपणे तत्पर झाले आहे. देहू नगरपंचायतीच्या मागणीनुसार इंद्रायणी नदीकाठी कापूर ओढा ते जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिर घाट या दरम्यान सुरू असलेल्या १३.०८ कोटी रुपयांच्या भव्य आणि अत्याधुनिक नवीन घाट विकासकामांचा दर्जा उत्तम राखत ती वेळेत पूर्ण करण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर, महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज (दि. १ जुलै) या घाटाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीचा सखोल आढावा घेतला. वारीच्या पवित्र काळात वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी भूसंपादन आणि जोडरस्त्याचे प्रलंबित प्रश्न देहू संस्थान व स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून तातडीने मार्गी लावण्याचा सकारात्मक संकल्प यावेळी ‘पीएमआरडीए’ने केला आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत ऐतिहासिक वारसा जपत जुन्या घाटाशी सुसंगत असे देखणे दगडी काम करणे, सुबक पाथ-वे तयार करणे, भक्कम घाट बांधणे, आधुनिक विद्युत व्यवस्था, सुशोभीकरण, स्वच्छतागृह निर्मिती आणि भाविकांच्या वाहनांसाठी दोन ठिकाणी सुनियोजित पार्किंग व्यवस्था करणे यांसारख्या विविध सोयी-सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थिती पाहता, घाटाचे १०० मीटरपर्यंतचे भरावाचे काम आणि नदीपात्रातील संरक्षणभिंतीचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. मात्र, कामाच्या ओघात समोर आलेले तांत्रिक अडथळे आणि भूसंपादनाशी संबंधित स्थानिक प्रश्न तातडीने सामोपचाराने मार्गी लावण्याचे निर्देश महानगर आयुक्तांनी दिले आहेत.

महानगर आयुक्त डॉ. चौधरी यांनी घाटाच्या कामाची बारकाईने पाहणी करत असताना, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांना खासगी जागामालकांशी योग्य समन्वय साधण्याचे तसेच देहू संस्थानशी सकारात्मक चर्चा करून रखडलेली जागा व जोडरस्ता लवकरात लवकर उपलब्ध करून घेण्याचे निर्देश दिले, जेणेकरून पावसाळ्यानंतर प्रकल्पाचे उर्वरित काम अधिक गतीने आणि युद्धपातळीवर पूर्ण करता येईल. विशेष म्हणजे, विकासकामे करताना पर्यावरणाचा समतोल राखण्यावरही ‘पीएमआरडीए’ने विशेष भर दिला आहे. वृक्षसंवर्धन समितीने ३० एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या अधिकृत परवानगीनुसारच आवश्यक तेवढीच झाडे तोडण्यात यावीत, आणि कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना महानगर आयुक्तांनी यावेळी संबंधित विभागाला दिल्या.
या महत्त्वपूर्ण आढावा दौऱ्याप्रसंगी ‘पीएमआरडीए’च्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, कार्यकारी अभियंता अनिता कुलकर्णी, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, उपअभियंता संजय पाठक, शाखा अभियंता सौरभ गवारी यांच्यासह प्रकल्प व्यवस्थापक, कंत्राटदार आणि सल्लागार उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विमानतळाच्या मेट्रो मार्गावर शिक्कामोर्तब; तर पौड फाटा ते वनदेवी होणार दुहेरी उड्डाणपूल !

‘निधी कमी पडू देणार नाही, तुम्ही मार्गांच्या रचना पुणेकरांच्या...

शिळेवरील गीतरामायण सादरीकरणाचा वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियामध्ये विश्वविक्रम

हटके ग्रुपचे शिरीष कुलकर्णी यांचा सन्मान  ; गीतरामायणातील २०...

वित्तीय संस्थांमध्ये पैसे अडकलेल्या ठेवीदारांना सरकारने दिलासा द्यावा-आमदार शिरोळे यांची सूचना

जप्त मालमत्तांचे लिलाव आणि परतावायाची कालमर्यादा निश्चित करावी पुणे :...