‘महाराष्ट्र कृषी दिना’चा महायुती सरकार ला विसर – काँग्रेस’ची टिका⁃ स्व वसंतराव नाईक महराष्ट्रातील ‘कृषी क्रांतीचे जनक’
पुणे दि १ जुलै – आमदार वा पक्ष फोडाफोडी न करता, नैसर्गिक न्यायाच्या लोकशाही तत्वाने सलग ११ वर्षे सत्तेवर राहीलेले, संयुक्त महाराष्ट्राचे ३ रे मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक यांचा ‘जयंती_दिन’ राज्यभर “कृषी दिन” म्हणुन साजरा केला जात असतो.
मात्र, राज्यातील विद्यमान ‘महायुती सरकार’ला याचा विसर झाल्याची टिका प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी काँग्रेस भवन येथे स्व वसंतराव नाईक जयंती दिनाच्या पुष्पहार अर्पण व अभिवादन कार्यक्रमात केली.
ते पुढे म्हणाले की,
स्व वसंतराव नाईक संयुक्त महाराष्ट्राचे तिसरे आणि सर्वाधिक काळ (सलग ११ वर्षे) मुख्यमंत्री राहिलेले द्रष्टे नेते होते. यवतमाळ जिल्ह्यातील (गहुली खेड्या’ तुन) बंजारा समाजातून आलेले वसंतराव नाईक या ‘ओबीसी-नेतृत्वास’ काँग्रेस पक्षाने वाव दिला आणि राजकारणात सामाजिक समानतेचा पाया घातला.
पुढे स्व वसंतराव जी नाईक यांनी महाराष्ट्रात ‘हरितक्रांती व पंचायत राज’ची मुहुर्तमेढ करीत नेतृत्वाची क्षमता सिध्द केली.
१९७२ च्या भीषण दुष्काळात त्यांनी शेती उत्पादनाला व सिंचन प्रकल्पांना प्राधान्य दिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण झाला व दुष्काळात ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजुरांना काम मिळवून देण्यासाठी त्यांनी ‘रोजगार हमी योजने’चा पाया रचला व दुग्धोत्पादनाला चालना देऊन श्वेतक्रांती घडवून आणली व राज्यात MIDC सारख्या संस्थां’च्या माध्यमातून औद्योगिकीकरणाला गती दिली व रोजगाराच्या संधी निर्माण केल्या अशा कर्मयोध्द्यास पुणे शहर जिल्हा काँग्रेस तर्फे सुमनांजली वहात, राज्यात पर्जन्यवृष्टी होऊन सुगीचे दिवस येण्यासाठी
राज्यातील समस्त बळीराजांना, शेतकरी बांधवांना ‘कृषी दिना’च्या काँग्रेसजनां तर्फे मन:पुर्वक शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.
या प्रसंगी पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चवधरी सह पदाघिकारी स्रर्वश्री राजाभाऊ कदम, गुलाम हुसेन खान, भगवान कडू,
सौ ऋग्वेदिता सपकाळ, दिपक ओव्हाळ, शबीर शेख, धनंजय पाटील, हरिदास आडसुळ, देविदास लोणकर, दादासाहेब कामठे, राजेंद्र पडवळ, रोहित साळवे, आबा तरवडे, धनंजय दाभाडे, ॲड फैय्याज शेख, प्रविण करपे, रवी आरडे, अमित कांबळे इ उपस्थित होते.

